Peas : मटार वर्षभर ताजे रहाण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे की फ्रीजरला? योग्य पद्धत आणि ही छोटी ट्रिक ठेवा लक्षात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा आपल्याला मटार खूप आवडते आणि ती केवळ सिझनल असल्याने, आपण जास्त प्रमाणात विकत घेतो. पण जास्त मटार आणल्यावर ती खराब होऊ नये म्हणून कशी साठवायची, हा प्रश्न गृहिणींना पडतो.
थंडीचा मौसम सुरू झाला की बाजारात हिरवीगार आणि टपोरी मटार दिसू लागतात. मटार ही अशी एक भाजी आहे, जिचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. मग ती मटारची भाजी असो, मटार पराठे, पुलाव असो वा इतर कोणताही भाताचा पदार्थ, मटारने पदार्थाची चव वाढतेच. अनेकदा आपल्याला मटार खूप आवडते आणि ती केवळ सिझनल असल्याने, आपण जास्त प्रमाणात विकत घेतो. पण जास्त मटार आणल्यावर ती खराब होऊ नये म्हणून कशी साठवायची, हा प्रश्न गृहिणींना पडतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ब्लांचिंग प्रक्रिया (Blanching Process):एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा.पाण्याला चांगली उकळी आली की, त्यात सोललेली मटार घाला. मटारला फक्त 2-3 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. जास्त वेळ उकळू नका.2-3 मिनिटांनंतर, लगेच मटार उकळत्या पाण्यातून काढून चिल्ड (खूप थंड) किंवा बर्फाच्या पाण्यात टाका. यामुळे मटारची शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि तिचा हिरवागार रंग तसाच राहतो.थंड झाल्यावर मटार पाण्यातून काढून घ्या आणि ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या. तुम्ही किचन टॉवेलवर पसरवून कोरडी करू शकता.पॅकिंग: मटार पूर्णपणे सुकल्यानंतर ती एअरटाइट फ्रीजर बॅगमध्ये (Air tight freezer bag) किंवा डब्यात पॅक करा.टिकाऊपणा: या पद्धतीने साठवलेली मटार ६-८ महिन्यांपर्यंत ताजी राहते आणि तिचा स्वाद व रंगही टिकून राहतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


