झणझणीत रगडा पकवानचा घ्यायचाय आस्वाद? 'इथं' होईल 30 रुपयात मन तृप्त
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
भारतात प्रत्येक भागानुसार खाद्य संस्कृती भिन्न आहे. बीडमध्ये या ठिकाणी खास रगडा पकवान मिळतोय.
advertisement
तर यालाच महाराष्ट्रात रगडा पॅटीस किंवा रगडा पकवान नावानं ओळखलं जातं. विशेषत: बीड शहरातील एका भेळच्या गाड्यावर हा पदार्थ गेल्या 6 वर्षांपासून मिळत आहे. बीडमधील खवय्ये या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात.
advertisement
advertisement
advertisement
अगदी घरगुती पद्धतीने हे रगडा पकवान तयार केले जाते. पकवान हे मैद्यापासून तयार केलेले असते. साधारणत: दुपारी चारच्या सुमारास या रगडा पकवानच्या विक्रीला सुरुवात होते. यामध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेले आंबट गोड पाणी त्यासह लाल तिखट, काळे तिखट, शिजवलेली डाळ आणि त्यामध्ये गरमागरम मटकी, कांदा आणि त्यावर कोथिंबीर टाकली जाते. त्यामुळे हा रगडा पकवान अधिकच चवदार आणि झणझणीत लागतो.
advertisement
advertisement