advertisement

अगदी कमी साहित्यात उपवासाला घरीच बनवा भगरीचे लाडू; सोपी रेसिपी पद्धत पाहा

Last Updated:
ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. त्यामुळे अनेक लोक उपवासाच्या दिवशी हे लाडू खाणे पसंत करतात.
1/6
विदर्भाच्या खाद्य संस्कृतीत विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे उपवासाचे भगरीचे लाडू होय. ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. त्यामुळे अनेक लोक उपवासाच्या दिवशी हे लाडू खाणे पसंत करतात.

2/6
 या लाडूची चव रव्याच्या लाडू प्रमाणे लागते. ही रेसिपी बनवण्यासाठी देखील अगदी सोपी असून कोणीही बनवू शकते. <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील गृहिणी शोभा सोनकुसरे यांनी भगरीचे लाडू कसे बनवावे? यासंदर्भात रेसिपी सांगितली आहे.
या लाडूची चव रव्याच्या लाडू प्रमाणे लागते. ही रेसिपी बनवण्यासाठी देखील अगदी सोपी असून कोणीही बनवू शकते. वर्धा येथील गृहिणी शोभा सोनकुसरे यांनी भगरीचे लाडू कसे बनवावे? यासंदर्भात रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/6
भगरीचे लाडू बनविण्यासाठी साहित्य : एक वाटी भगर, एक वाटी साखर, साजूक तूप, विलायची आणि ड्रायफ्रूट्स हे साहित्य लागेल.

4/6
भगरीचे लाडू बनविण्यासाठीची कृती : सर्वप्रथम भगर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये साजूक तूप घालायचं. तूप गरम झाल्यावर त्यात भगर अ‍ॅड करून चांगलं भाजून घ्यायचं आहे.

5/6
5 ते 7 मिनिटं भगर तुपात भाजून होईपर्यंत एका साईडने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका छोट्या गंजामध्ये थोडसं पाणी अ‍ॅड करून त्यात एक वाटी साखर घालायची आहे. (त्यातच वेलची पुडही अ‍ॅड करू शकता किंवा नंतर अ‍ॅड केली तरीही चालेल)

6/6
पाक तयार होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतील. तोपर्यंत भाजून झालेली भगर एका ताटात थंड होण्यासाठी काढायची. भगर थंड झाल्यावर साखरेचा तयार केलेला साधा पाक त्यात अ‍ॅड करायचा आहे. त्यानंतर चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची अ‍ॅड करता येईल. आता हे लाडू वळून घ्या आणि सजावट करून तुम्ही त्याला सर्व्ह करू शकता.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement