नवरात्रीच्या उपवासाठी नेहमीपेक्षा वेगळा तयार करा घरीच ‘हा’ पदार्थ; झटपट बनवून होईल तयार
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
नेहमीपेक्षा वेगळा उपवासाचा पदार्थ ट्राय करण्याची इच्छा असते. अशांसाठी उपवासाचा चाट हा एक उत्तम पर्याय आहे.
नवरात्री काहीचं दिवसावर आली आहे. नवरात्रीत अनेकजण उपवास करत असतात. या काळात शाबू, भगर आणि नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. नेहमीपेक्षा वेगळा उपवासाचा पदार्थ ट्राय करण्याची इच्छा असते. अशांसाठी उपवासाचा चाट हा एक उत्तम पर्याय आहे. वर्धा येथील गृहिणी नीलम वांदिले यांनी उपवासाच्या चाटची खास रेसिपी सांगितली आहे.
advertisement
कोणताही पदार्थ बनवायचा तर साहित्य आलंच. उपवासाच्या चाटसाठी घरातील साहित्य वापरू शकता. त्यासाठी उकडून किसलेला बटाटा, लाल तिखट, हिमालयीन मीठ, जिरेपूड, मिरेपूड, गोड दही, भजलेले शेंगदाणे, बटाट्याचे पातळ चिप्स, उपवासाची शेव(शिंगाड्याचे शेव), डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची पेस्ट, खोबरा कीस हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement