नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार करा ‘ही’ पौष्टिक रेसिपी; बनवण्याची पद्धत पाहा
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार होणाऱ्या पौष्टिक धिरड्याची रेसिपी सांगणार आहोत.
advertisement
advertisement
आजही ग्रामीण भागामध्ये धिरडं आवडीने बनवलं आणि खाल्लं जातं. पारंपरिक धिरड्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. गव्हाच्या पिठात लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि इतर साहित्य घालून त्यामध्ये पाणी घालून पौष्टिक धिरडे तयार केले जाते. गावाकडे आवर्जून धिरडं बनवलं जातं आणि दही, उसळ किंवा चटणीसोबत खाल्लं जातं. नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
धिरडं बनवण्यासाठी अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धा कप दही, एक चमचा आले लसूण पेस्ट, एक चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची आणि हिरवे धणे पेस्ट, एक चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, किसलेले खोबरे, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी हे साहित्य आवश्यक असते. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य किचनमध्ये उपलब्धच असतं.
advertisement
advertisement