एकाच ठिकाणी घ्या 15 प्रकारच्या खाकऱ्याचा आस्वाद; एकदा खाल तर पुन्हा याल
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यात याठिकाणी खाकरा हा 15 प्रकारमध्ये मिळतो.
advertisement
परंतु हा खाकरा आरोग्यासाठी अतिशय हेल्दी फूड असा आहे आणि हे कधी ही खाऊ शकता असा आहे. यामध्ये देखील अनेक प्रकारचे फ्लेवर्स पाहिला मिळतात. आज आपण पाहणार आहोत की खाकरा हा नेमकं कसा बनवला जातो. पुण्यात हा खाकरा कुठे मिळतो.
advertisement
पुण्यात जोशी फूड मार्ट या नावाने एक दुकान आहे. याठिकाणी दत्तात्रय जोशी हे खाकरा विकतात. याठिकाणी खाकरा हा 15 प्रकारमध्ये मिळतो. यामध्ये मसाला, चीझ, सॅलईड पाणीपुरी, चोरा पुल्ली, मेथी, पावभाजी, कोथिंबीर, साधा पंजाबी मसाला जिरा, चाट मसाला, पेरिपेरी, चणा जोर असे विविध प्रकार पाहिला मिळतात. या ठिकाणी खाकरा खाण्यासाठी मोठी गर्दी पाहिला मिळते.
advertisement
खाकरा हा गव्हाचे पीठ, तेल आणि विविध मसाल्यांचा वापर करून बनवला जातो. मसाला खाकरावर आधी शेजवान चटणी लावतो. मग त्यानंतर कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर आणि लिंबू पिळतो वरून याला हिरवी चटणी टोमॅटो चटणी पण असते. यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आम्ही उपलब्ध करून देत असतो. म्हणजे प्लेन खाकरा असेल तर टोमॅटो, कांदा घालून देतो.
advertisement