Sticker On Fruits : फळावरील स्टिकरचा आपल्या आरोग्याशी असतो थेट संबंध! अर्थ समजून घ्या, होईल फायदा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What does sticker on fruits mean : आपण बाजारातून फळे खरेदी करताना त्यावर लावलेल्या छोट्या स्टिकरकडे कधी लक्ष दिले आहे का? अनेकदा ग्राहक याकडे केवळ ब्रँडिंग किंवा सजावट म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र हे स्टिकर्स फक्त शोभेसाठी नसतात. या स्टिकर्सवर PLU म्हणजेच Price Look Up नावाचा एक विशेष कोड असतो, जो ग्राहकांना फळांच्या लागवडीच्या पद्धतीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. या कोडचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी जोडलेला आहे. योग्य PLU कोड वाचून तुम्ही फळांची गुणवत्ता सहज ओळखू शकता.
PLU कोडचा आरोग्याशी संबंध : फळांवरील हा PLU कोड सहसा 4 किंवा 5 अंकांचा असतो. यातील पहिला अंक हे ठरवतो की, फळ कोणत्या पद्धतीने पिकवले गेले आहे. हा कोड वाचून तुम्ही सहजपणे सांगू शकता की, तुम्ही निवडलेले फळ सेंद्रिय आहे, रासायनिक प्रक्रिया केलेले आहे की आनुवंशिकरित्या सुधारित आहे. उच्च दर्जाचे फळ खाणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फळ सेंद्रिय असो वा रासायनिक प्रक्रिया केलेले, कोणतेही फळ खाताना ते नेहमी स्वच्छ धुवून खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फळांच्या पृष्ठभागावरील बॅक्टेरिया किंवा रसायनांचे अंश निघून जाणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच, उपलब्ध असल्यास हंगामी फळे खरेदी करा, कारण ती अधिक ताजी आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.
advertisement


