Team India : तिन्ही फॉरमॅटमध्ये निवड, पण Playing XI मध्ये चान्स नाही, भारताच्या स्टारचं करिअर कोण खराब करतंय?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आशिया कप विजयानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅट खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या सामन्यात भारतीय टीम दोन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनरसह दोन ऑलराऊंडरना घेऊन मैदानात उतरली आहे, पण पुन्हा एकदा भारताच्या प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांच्यावर आहे. तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन स्पेशलिस्ट स्पिनर आहेत. याशिवाय अक्षर पटेल आणि शिवम दुबे या ऑलराऊंडरनाही बॉलिंग करावी लागणार आहे. पण प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अर्शदीप सिंगला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्शदीपऐवजी हर्षित राणाला संधी दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अर्शदीप सिंग हा टी-20 स्पेशलिस्ट बॉलर आहे. टी-20 मधल्या कामगिरीच्या जोरावर अर्शदीपने भारताच्या वनडे आणि टेस्ट टीममध्येही जागा मिळवली. अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही भारतीय टीमचा भाग होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तसंच इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही अर्शदीप भारतीय टीममध्ये होता, पण तिथेही त्याला बेंचवरच बसावं लागलं.
advertisement
आशिया कपमध्येही अर्शदीपला खेळण्याची फार संधी मिळाली. भारतीय टीमच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये असूनही अर्शदीप सिंगला बेंचवरच बसावं लागत असल्यामुळे त्याचं करिअर खराब होत असल्याची टीका चाहते करत आहेत.
अर्शदीपऐवजी राणाला संधी का?
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने अर्शदीप सिंगऐवजी हर्षित राणाला संधी का दिली जात आहे? याचं कारण सांगितलं आहे. 'आठव्या क्रमांकावर मजेशीर नाव आहे, हर्षित राणा. यावरून गौतम गंभीर आणि अजित आगरकरच्या नेतृत्वातल्या टीमचा माईंडसेट लक्षात येतो. बॅटिंग जास्त असावी असा त्यांचा विश्वास आहे. अर्शदीपऐवजी हर्षितला संधी दिली जात आहे, याचं एकमेव कारण म्हणजे हर्षितची बॅटिंग. टेस्ट, वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये टीमने हे सातत्य दाखवलं आहे. नितीश रेड्डी फिट असता तर त्याला टीममध्ये फिट कसं केलं असतं? हे पाहणं औत्सुक्याचं असतं', असं दिनेश कार्तिक म्हणाला आहे.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्सर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : तिन्ही फॉरमॅटमध्ये निवड, पण Playing XI मध्ये चान्स नाही, भारताच्या स्टारचं करिअर कोण खराब करतंय?


