Rain Alert: विजा कडाडणार, पुन्हा झोडपणार, संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. पुढील 24 तास पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 26 मे (शनिवार) ते 26 मे (सोमवार) दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

advertisement
2/5
मराठवाड्यात पुढील 3 दिवस ढगाळ हवामान राहणार असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि काही ठिकाणी जोरदार सरींचा अनुभव येऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 24 मे रोजी दुपारी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

3/5
या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत पोहोचू शकतो. 25 आणि 26 मे रोजीही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. या हवामान बदलांमागे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांचा प्रभाव आहे.

4/5
हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः काढणीस तयार असलेल्या पिकांचे उत्पादन सुरक्षित स्थळी साठवावे आणि फळबागांवर होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही हवामानातील बदलांबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.

5/5
विजांच्या कडकडाटाच्या वेळी शक्यतो घरात राहून सतर्कतेने वावरणे आवश्यक आहे. हवामान खात्याच्या दररोजच्या अंदाजावर लक्ष ठेवणे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या हवामान बदलांमुळे मराठवाड्यातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे.

Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement