Marathwada weather : वारे वाहणार, विजांचा कडकडाट होणार, मराठवाड्याला पुढील 24 तास महत्त्वाचे!

Last Updated:
मराठवाड्यात 25 मे रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 
1/7
राज्यात गेले काही दिवस पावसाळी वातावरण असल्याचे दिसून येत आहे. विविध भागांत मान्सून पूर्व पाऊस दाखल झाल्याने शेतीचे भरपूर नुकसान होत आहे. मराठवाड्यातही काहीशी अशीच स्थिती बघायला मिळत आहे.

advertisement
2/7
 मराठवाड्यात 25 मे रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठवाड्यात 25 मे रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/7
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

4/7
25 मे रोजी मराठवाड्यातील कमाल तापमान सरासरी 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 22 ते 25 अंशांपर्यंत राहू शकते. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी उकाडा जाणवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

5/7
छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जालना व हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

6/7
 या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची योग्य काळजी घ्यावी. उघड्यावर असलेले शेतीचे साहित्य, धान्य किंवा खतांचा साठा सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

7/7
जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवावे आणि विजेच्या तारा, खांब यापासून सावध रहावे, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. हवामानात होणाऱ्या या अचानक बदलामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच, हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement