Marathwada Rain: महिनाअखेर सुट्टी, मराठवाड्यात जोरदार पाऊस कधी? हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट आलंय.
1/5
राज्यातील कोकण किनारपट्टीसह विदर्भात मान्सूनचा जोर कायम आहे. मराठवाड्यात मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिलीये. पेरण्या झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अशातच हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट आलं आहे. पुढील काही दिवस मराठवाड्याला पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतलीये. काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी बरसल्या आहेत. आज मराठवाड्यात ढगाळ हवामान राहणार असलं तरी कोणत्याही जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही.

3/5
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ राहणार असून अधूनमधून ऊन-पावसाचा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव व परभणीमध्येही अशाच प्रकारचे हवामान राहणार असून, काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

4/5
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु, अपेक्षित पाऊस होणार नाही. जुलैच्या सुरुवातीला हवापलट होणार आहे. हिंगोली, नांदेड आणि परभणी परिसरात 1 जुलैला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

5/5
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ढगाळ हवामानामुळे दमटपणा वाढला असून दिवसाचे तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान सुद्धा 24 ते 25 अंश दरम्यान राहणार आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement