Badlapur News: बदलापुरात मनसेचा वाईन शॉप बाहेर मोठा राडा, मालकाला आणलं गुडघ्यावर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Badlapur Liquor Shop News: बदलापूरमध्ये एका वाईन शॉप मालकाला काही मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. मराठी भाषा येत नसल्यामुळे मनसैनिकांनी त्या वाईन शॉप मालकाला व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे.
बदलापूरमध्ये एका वाईन शॉप मालकाला काही मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. मराठी भाषा येत नसल्यामुळे मनसैनिकांनी त्या वाईन शॉप मालकाला व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे.
advertisement
बदलापूरातल्या एका वाईन शॉपच्या बाहेर सर्रास दारू विकली जात होती. त्याच कारणामुळे अनेक मनसैनिकांनी वाईन शॉप चालकाला चांगलाच चोप दिला आहे. चोप देत असताना वाईन शॉप मालकाने मनसैनिकांची हात जोडून माफी मागितली आहे.
advertisement
वाईन शॉपच्या बाहेर आज सायंकाळी (11 ऑक्टोबर) मनसैनिकांना जबरदस्त राडा घातला होता. वाईन शॉपच्या बाहेर अनेक तळीराम सर्रासपणे दारू पिताना दिसत आहेत. त्या रस्त्यावरून अनेक लहान मुलं, तरूण- तरूणी, महिला जात असतात, यामुळे मनसेकडून वाईन शॉप मालकाला अल्टिमेटम देत रस्त्यावर पित असणारे लोकं बंद करण्याची मागणी केली.
advertisement
रहदारीच्या रस्त्यावरच हे वाईन शॉप आहे. वाईन शॉपमध्ये दारू खरेदी केल्यानंतर अनेक तळीराम थेट वाईन शॉपच्या बाहेर उभे राहूनच दारू पिताना दिसायचे. याचा अनेक सामान्य नागरिकांना त्रास होत होता. यामुळे मनसेने वाईन शॉप मालकाला चांगलंच वठणीवर आणलं आहे. अनेक तळीराम दारू कचऱ्याच्या डब्ब्याचा वापर न करता, थेट खालीच बाटल्या फेकत होते.
advertisement
त्यामुळे वाईन शॉपच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसायचा. वाईन शॉप मालकासोबत मनसैनिक संवाद साधत असताना तो हिंदी भाषेमध्ये संवाद साधत होता. त्यामुळे जर तू महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतोय, तर तुला मराठी भाषा यायलाच हवी अशी धमकी दिली आहे. वाईन शॉप मालकाने मनसैनिकांची हात जोडून माफी मागितली.