मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री, ज्या घटस्फोटानंतरही राहिल्या सिंगल! एकीच्या नवऱ्याने तर केली 3 लग्न
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi actresses divorce : मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यातील चढ-उतारांमुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. काही कलाकारांनी मोठ्या थाटात संसार थाटले, पण दुर्दैवाने त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकले नाही.
मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यातील चढ-उतारांमुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. काही कलाकारांनी मोठ्या थाटात संसार थाटले, पण दुर्दैवाने त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकले नाही.
advertisement
मात्र यापैकी काही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर पुन्हा लग्न न करता सिंगल राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच काही धाडसी आणि लोकप्रिय अभिनेत्रींबाबत खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
या यादीत सर्वात आधी नाव येते ते लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे. २०१२ मध्ये तिने बालपणीचा मित्र आणि व्यावसायिक भूषण भोपळे यांच्याशी लग्न केले. पण काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. तेजस्विनी आजही अविवाहित आयुष्य जगत आहे.
advertisement
दुसरीकडे, अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने सिद्धार्थ बांडियासोबत लग्न केले होते, पण सिद्धार्थने आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत तिने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. स्मिता आजही सिंगल आहे.
advertisement
या यादीत आणखी दोन अभिनेत्रींचा समावेश आहे, ज्या एकाच अभिनेत्यामुळे चर्चेत आल्या. अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिने २०१० मध्ये अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केले, पण २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
त्यानंतर पियुषने दुसरी अभिनेत्री मयुरी वाघसोबत २०१७ मध्ये लग्न केले, पण हे नातेही काही महिन्यांतच तुटले. मयुरी वाघ हिनेही घटस्फोटानंतर अविवाहित राहणे पसंत केले आहे. शाल्मली आणि मयुरी दोघी आजही सिंगल आहेत. यानंतर पियुषने अभिनेत्री सुरूची अडारकरशी तिसरे लग्न केले.
advertisement
याशिवाय, ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर हिने अमेय गोसावीशी लग्न केले होते, पण त्यांचे नाते टिकले नाही. सई नंतर एका रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यातही ब्रेकअप झाल्यामुळे ती आज सिंगल आहे.
advertisement
त्याचप्रमाणे, 'बिग बॉस मराठी'मुळे खूपच चर्चेत राहिलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचेही वैवाहिक जीवन धोक्यामुळे मोडले आणि तिने घटस्फोट घेऊन अविवाहित राहणे पसंत केले.
advertisement
या यादीत आणखी एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री आणि अभिनेता शशांक केतकर यांनी लग्न केले होते, पण वर्षभरातच त्यांचा संसार तुटला आणि तेजश्रीनेही त्यानंतर सिंगल राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement