क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा उलटफेर, नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, थरारक सामन्याचा मॅच रिपोर्ट!

Last Updated:

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दुबळ्या वाटणाऱ्या नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे.

क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा उलटफेर, नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, थरारक सामन्याचा मॅच रिपोर्ट!
क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा उलटफेर, नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, थरारक सामन्याचा मॅच रिपोर्ट!
मुंबई : आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दुबळ्या वाटणाऱ्या नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकमेव टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये नामिबियाचा 4 विकेटने विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 135 रनचं आव्हान नामिबियाने 6 गमावून 20 ओव्हरमध्येच पार केलं. दक्षिण आफ्रिकेचा टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला हा असोसिएट मेंबर टीमविरुद्धचा पहिला पराभव आहे. तर दुसरीकडे नामिबियाने आयसीसीच्या चौथ्या पूर्ण सदस्य टीमचा पराभव केला आहे. याआधी नामिबियाने आयर्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वेला पराभवाचा धक्का दिला होता.
दक्षिण आफ्रिकेचं आव्हान पार करताना नामिबियाला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 23 रनची गरज होती, यानंतर त्यांनी 19व्या ओव्हरला 12 तर 20व्या ओव्हरमध्ये 14 रन करून थरारक विजय मिळवला. नामिबियाकडून झेन ग्रीनने 23 बॉलमध्ये नाबाद 30 रनची खेळी केली, तर रुबेन ट्रम्पलमेन 8 बॉलमध्ये 11 रनवर नाबाद राहिला. कर्णधार गेरहार्ड इरासमसने 21 रनची महत्त्वाची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर, ऍन्डिले साईमलेन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. तर गेराल्ड कोटझी आणि फोर्टुइनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांना सुरूवातीपासूनच धक्के बसायला सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतलेला क्विंटन डिकॉक फक्त 1 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या जे स्मिथने सर्वाधिक 30 रन केले, तर ओपनर लुहान ड्रे प्रिटोरियसने 22, रुबिन हेरमॅनने 23 रनची खेळी केली. नामिबियाकडून ट्रम्पलमेनने 3 विकेट घेतल्या, तर मॅक्स हेइंगोला 2 विकेट मिळाल्या. इरासमस, शिकोंगो आणि स्मिटला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेट इतिहासातला सगळ्यात मोठा उलटफेर, नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, थरारक सामन्याचा मॅच रिपोर्ट!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement