मावळ, खेड, हवेली तालुक्यातील 12 गावांच्या नागरिकांसोबत खासदार मैदानात, दिला इशारा

Last Updated:

नांदती घरं मोडून विकास होत नाही अशा शब्दात अमोल कोल्हेंनी सरकारला इशारा दिला आहे.

News18
News18
पुणे :  पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचं भिजत घोंगडं असताना तळेगाव उरुळीकांचन या आणखी एका प्रस्तावित बायपास रेल्वे मार्गामुळे खेड, मावळ, हवेली तालुक्यातील भूमिपुत्र हवालदिल झाले आहेत. या प्रकल्पामुळे येथील 12 गावातील शेतीवरच नव्हे तर घरांवरही बुलडोझर फिरणार असल्यानं हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जोर धरत आहे.या प्रकल्पाच्या विरोधात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट भूमिका घेत ,ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नांदती घरं मोडून विकास होत नाही अशा शब्दात अमोल कोल्हेंनी सरकारला इशारा दिला आहे.
तळेगाव उरुळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला चाकण औद्योगिक क्षेत्रातील 12 गावांसह मावळ हवेली तालुक्यातील शेतक-यांनी ठरावपूर्वक विरोध दर्शवलाय. यावरुन शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी मेळाव्यातून या प्रकल्पाला थेट विरोध करत नांदती घरे मोडून विकास होत नाही, विकास हवा असेल तर नांदती घरं मोडायची नसतात,’ अशा शब्दांत सुनावलं.

मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला

advertisement
चाकण औद्योगिक क्षेत्रातील १२ गावे तसेच मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट भूमिका घेत ,ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.यावेळी बोलताना खासदार कोल्हे यांनी विकास हवा असेल तर नांदती घरं मोडायची नसतात, असे सांगून रेल्वे प्रशासनाला इशारा दिला. तसेच, 'हात जोडता येतात, पण गरज पडल्यास मुठीही वळवता येतात' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement

रेल्वे बायपास प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता

दरम्यान या प्रकल्पामुळे चाकणमधील १२ गावांमधील आणि मावळ, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. आधीच एमआयडीसी, रिंगरोड आणि महामार्गांसाठी जमिनी गेल्या असताना आता रेल्वेसाठीही जमीन का द्यायची, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधामुळे हा रेल्वे बायपास प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मावळ, खेड, हवेली तालुक्यातील 12 गावांच्या नागरिकांसोबत खासदार मैदानात, दिला इशारा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement