कोल्हापूरला फिरायला जाताय? 'ही' 10 ठिकाणं पाहिलीच पाहिजे पाहा PHOTOS
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर आहे कोल्हापुरातील बऱ्याचशा पर्यटन स्थळांना वर्षातील कोणत्याही काळात भेट देता येते.
advertisement
advertisement
रंकाळा तलाव : कोल्हापूर म्हटलं की रंकाळा हे बऱ्याच जणांना ठाऊक आहे. त्यामुळेच अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ असणारा रंकाळा तलाव हे ठिकाण पर्यटकांच्या यादीतील महत्त्वाचे नाव असते. या तलावाचा सुंदर असा नजारा, तलावाच्या बाजूने तटबंदी आणि बगीचा, खाण्यापिण्याच्या विविध गोष्टींचे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळतात.
advertisement
कोल्हापूर वस्तूसंग्रहालय (टाऊन हॉल) : कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे. यासंदर्भातील अतिशय उत्तम माहितीचे भांडार म्हणजेच कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल म्युझियम अर्थात कोल्हापूर वस्तुसंग्रहालय होय. या वस्तुसंग्रहालयामध्ये जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी पाहता येतात.
advertisement
न्यू पॅलेस : करवीर संस्थानचा महत्त्वाचा ठेवा म्हणजेच नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस आहे. खरंतर हे देखील एक वस्तू संग्रहालयच आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा रस्त्याला लागूनच असणारा हा संस्थानकालीन राजवाडा म्हणजे आजचे, श्रीमंत शाहु महाराज छत्रपती यांचे निवास्थान आहे. तर राजवाड्याच्या आतील बाजुस राजर्षी शाहू महाराजांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे.
advertisement
कणेरी मठ : कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय हे कोल्हापुरात येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. ग्रामीण भागातील वातावरणाचे दर्शन या ठिकाणी मुर्त्यांच्या स्वरुपात होते. ऐतिहासिक मंदिरांबरोबर या परिसरात 4डी, 7डी मध्ये लघुपट पाहणे, हॉरर हाऊस, हॉल ऑफ मिरर यासारखे आधुनिक गोष्टी देखील पाहायला मिळतात.
advertisement
पन्हाळा : पन्हाळगड हे तर कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांच्या यादीतील एक सर्वात प्रसिद्ध नाव आहे. डोंगरावर वसलेला पन्हाळा किल्ला आणि मुळातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांना बघण्यासारखी बरेचशी ठिकाणे आहेत. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला, परिसरातील इतिहसाच्या खुणा, बगिचे आणि डोंगरावरुन दिसणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पन्हाळ्याला आवर्जून भेट द्यायला हवी.
advertisement
जोतिबा : पन्हाळ्याच्या भेटीत इतिहासात डोकावल्यानंतर तेथून जवळच दुसरे एक पर्यटनस्थळ आहे. कोल्हापुरातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि अजून एक थंड हवेचे ठिकाण असलेले पर्यटनस्थळ म्हणजे वाडी रत्नागिरीचे श्रीक्षेत्र जोतिबा. महाराष्ट्र आणि बाहेरून कित्येक जोतिबा भक्त या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात.
advertisement
बुद्धकालीन लेणी, पोहाळे : श्रीक्षेत्र जोतिबा या ठिकाणी कोल्हापूर-वडणगे-कुशिरे मार्गाने जाताना पोहाळे येथे डोंगरात कोरलेली बुद्धकालीन लेणी लागतात. हे ठिकाण देखील भेट देण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे. कोल्हापूरपासून 15 किमी अंतरावर ही लेणी आहेत. रोडपासून डोंगरावरच थोड्या खालच्या बाजूला गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत ही लेणी निदर्शनास पडतात.
advertisement
गगनगिरी आश्रम मठ : गगनबावडा परीसरात असणारे गगनगिरी महाराजांचा गगनगिरी मठ हेही एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. कोल्हापूर शहरापासून जवळपास ६० किमी अंतरावर गगनबावडा तालुक्यात हे ठिकाण आहे. मठाच्या वरुन डोंगर-दऱ्यांचे निसर्गसौंदर्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य असते. पावसाळ्यात तर या ठिकाणी सर्वत्र हिरवी चादर पांघरलेले डोंगर बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
advertisement
करुळ घाट : कोल्हापुरातील गगनबावडा तालुका म्हणजे महाराष्ट्राचे चेरापूंजी म्हणून ओळखले जाते. याच गगनबावड्यात सन 1968 पासून करुळ घाटातून वाहतुक सुरू आहे. कोल्हापूर-विजयदुर्ग मार्गावर गगनबावडा तालुक्यात हा 13 कि. मी. अंतराचा हा घाट आहे. पावसाळ्यात तर या घाटातून प्रवास करताना अनेक नयनरम्य दृश्ये पहावयास मिळतात.