IAS Love Story: ट्रेनिंगमध्ये पडले प्रेमात; अधिकारी झाल्यानंतर उडवला लग्नाचा बार; एक IAS तर दुसरा IPS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Saumya Sharma IAS Love Story: मसुरी येथील LBSNAA म्हणजेच IAS, IPS, IFS अधिकार्यांचा प्रशिक्षण कारखाना. UPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्येकाचे येथे जाण्याचे स्वप्न असते. एलबीएसएनएएमध्ये अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबतच जोड्याही तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वास्तविक, प्रशिक्षणासाठी बराच वेळ एकत्र घालवल्याने त्यांची मैत्री होते आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात होते. IAS सौम्या शर्मा आणि IPS अर्चित चांडक (Archit Chandak IPS) यांच्यासोबत असेच काहीसे घडले.
Saumya Sharma IAS Love Story: असं म्हणतात की प्रत्येकाची जोडी वरुन आधी बनलेली असते. लोकांना फक्त एकमेकांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी भेटायचं असते. IAS-IPS अधिकाऱ्यांच्या बहुतेक जोड्या त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात म्हणजेच LBSNAA मध्ये बनतात. मग ती IAS रिया दाबी अशो किंवा IAS सौम्या शर्मा, या मसूरीतच LBSNAA (LBSNAA Mussoorie) आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला भेटले. बराच काळ सोबत घालवल्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागत नाही.
advertisement
Saumya Sharma IAS Husband: सौम्या शर्मा 2018 च्या बॅचची IAS अधिकारी आहे. त्याचवेळी त्यांचे पती अर्चित चांडक हे त्याच बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या दोघेही नागपूर, महाराष्ट्र येथे तैनात आहेत. IAS सौम्या शर्मा नागपूर जिल्हा परिषदेच्या CEO आहेत (Saumya Sharma IAS Current Posting) आणि IPS अर्चित चांडक नागपुरात DCP (Archit Chandak IPS Current Posting) या पदावर आहेत.
advertisement
Saumya Sharma IAS Biography: आयएएस सौम्या शर्माचे आयुष्य खूप आव्हानात्मक आहे. दिल्लीची रहिवासी असलेल्या सौम्याने नॅशनल लॉ स्कूलमधून वकिली केली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी सौम्या शर्माची एका अपघातात श्रवणशक्ती गेली. ती श्रवणयंत्राच्या मदतीने ऐकते. सौम्या शर्माने 2017 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत 9वा रँक मिळवला (IAS Saumya Sharma Rank). सरकारी नोकरीच्या तयारीसाठी त्यांना फक्त 4 महिन्यांचा अवधी मिळाला होता.
advertisement
Archit Chandak IPS Biography: अर्चित चांडक यांनी आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्याच्या इंटर्नशिपदरम्यान एका जपानी कंपनीने त्यांना 35 लाख पगाराची नोकरी देऊ केली. मात्र, त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्यांनी ती ऑफर नाकारली. 2017 मध्ये, तो UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात 184 व्या क्रमांकासह आयपीएस अधिकारी बनला. तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा बुद्धिबळपटू देखील आहे.









