विदर्भात हवामान बदललं, 5 जिल्ह्यांत थंडीचा जोर, जाणून घ्या आज काय स्थिती?

Last Updated:
Weather Forecast: दिवाळीनंतर विदर्भात थंडीची तीव्रता वाढत असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 13 अंशांपर्यंत घसरला आहे. आज विदर्भातील हवामान स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
1/5
राज्यात नोव्हेंबर अखेर थंडीची तीव्रता वाढत आहे. दिवाळीनंतरच विदर्भात गारठा वाढण्यास सुरुवात झाली होती. आता विदर्भाचा पारा 13 अंशापर्यंत घसरला असून पुढील काही काळ थंडीचा जोर कायम राहणार आहे.

advertisement
2/5
विदर्भात आज धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे. मात्र, कुठलीही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली नाही. चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस इतके असेल. काही दिवस आधी या जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा 13 ते 14 अंश सेल्सिअस वर घसरला होता. आता मात्र किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 

3/5
अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके आहे. या जिल्ह्यातील किमान तापमान देखील काही दिवसा आधी 13 ते 14 अंश सेल्सिअस इतके होते. आता यात सुद्धा वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता थंडीचा जोर कमी वाटेल. 

4/5
भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 13 ते 14 अंश सेल्सिअस इतके आहे. या जिल्ह्यातील तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. गोंदिया भंडारा या दोन जिल्ह्यातील थंडीचा जोर कायम आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत राहणे आवश्यक आहे.  

5/5
काही दिवस आधी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली होती. आता त्यात बदल होताना दिसून येत आहे. काही जिल्ह्यांत ती घट कायम आहे. पण काही जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ झाली आहे. सर्वच जिल्ह्यांत धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement