पुण्यात मध्यरात्री दगडुशेठ मंदिराशेजारी भीषण अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारे PHOTO

Last Updated:
पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग लागली. १० अग्निशमन गाड्या आणि ५० जवानांनी आग विझवली. जीवितहानी नाही.
1/7
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे: बुधवार पेठेतील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या शेजारी असलेल्या एका दुमजली लाकडी वाड्याला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

advertisement
2/7
अग्निशमन दलाला रात्री १:०६ वाजता घटनेची माहिती मिळताच, तातडीने १० अग्निशमन गाड्या, ५ अधिकारी आणि ५० जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

3/7
वैभव सोनवणे यांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या वृत्तानुसार, या आगीत दत्त मंदिराशेजारी असलेला जुना, दुमजली लाकडी वाडा पूर्णपणे जळून खाक झाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच, वाड्याच्या खाली असलेल्या दोन दुकानांनाही आगीची झळ पोहोचल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

4/7
मात्र, आगीची चाहूल लागताच वाड्यात आणि दुकानांमध्ये असलेल्या जवळपास ८ ते १० नागरिकांनी सतर्कता दाखवत वेळीच बाहेर धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

5/7
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. दत्त मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा जोरदार मारा करत आग विझवण्याचे आणि बचावकार्य करण्याचे काम सुरू ठेवले आहे.

6/7
वैभव सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जवानांनी धोक्याची पर्वा न करता काका हलवाई दुकानात प्रवेश केला आणि रस्त्याच्या बाजूने शिडीच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले.आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार लाकडी बांधकाम आणि वाऱ्यामुळे आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले.

7/7
अग्निशमन दलाचे जवान आग पूर्णपणे विझवण्यासाठी अजूनही प्रयत्न करत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये. या आगीच्या घटनेमुळे बुधवार पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement