उसाच्या शेतात लावलं टरबूज, आंतरपीकातून शेतकरी मालामाल, एकरी 2 लाखांचं उत्पन्न
- Reported by:Kale Narayan
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आंतरपीक म्हणून जालन्यातील शेतकऱ्याने उसाच्या शेतात टरबूज लागवड केली. यातून एकरी 2 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
advertisement
अंबड तालुक्यातील वडिगोद्री जवळील पिठोरी सिरसगाव येथील अशोक आटोळे यांनी टरबूज शेती केली. आपल्या एक एकरात 5 बाय 1.25 फूट अंतरावर बियाणे वापरले. मल्चिंग, ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करून टरबूज लागवड केली. दोन किलोपासून सहा किलोपर्यंत वजनाचे टरबूज आले. त्यामुळे विक्रमी 25 टन टरबुजाचे उत्पादन मिळाले, असे आटोळे यांनी सांगितले.
advertisement
टरबूज शेतीतून 14 टनाला 9.50 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 1 लाख 25 हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले. तर 10 टनाला 7 रुपये किलोप्रमाणे 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण 1 लाख 95 हजार रुपये या शेतीतून मिळाले. यामध्ये 35 हजार रुपये खर्च सोडता निव्वळ एक लाख साठ हजारांचा नफा त्यांना झाला आहे. तर एकूण तीन एकर क्षेत्रावर साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आटोळे यांना आहे.
advertisement
advertisement
advertisement








