१ फेब्रुवारीपासून आधार कार्ड अन् मालमत्ता खरेदी-विक्री नियमांत मोठे बदल! या गोष्टी असणार अनिवार्य

Last Updated:

Property Rules : देशात वाढत्या मालमत्ता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Property Rules
Property Rules
मुंबई : देशात वाढत्या मालमत्ता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्य सरकारांनी १ फेब्रुवारी २०२६ पासून मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आधार प्रमाणीकरण सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार, मालमत्तेची नोंदणी करताना खरेदीदार, विक्रेता तसेच साक्षीदारांना आपली ओळख आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे सिद्ध करावी लागणार आहे.
आता सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी प्रक्रियेच्या वेळी संबंधित व्यक्तींना फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन देणे अनिवार्य असेल. यामुळे बनावट कागदपत्रांद्वारे होणारे व्यवहार, खोटी ओळख वापरून होणारी नोंदणी आणि गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे.
फसवणूक आणि बेनामी व्यवहारांवर लगाम
गेल्या काही वर्षांत देशभरात जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये खऱ्या मालकाच्या नावावर दुसऱ्याने जमीन विकल्याचे, बनावट साक्षीदार वापरून व्यवहार केल्याचे किंवा मृत व्यक्तींच्या नावावर नोंदणी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि कायदेशीर वाद वर्षानुवर्षे चालतात. आधार प्रमाणीकरणामुळे व्यवहारात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख थेट केंद्र सरकारच्या डेटाबेसशी पडताळली जाणार असल्याने बेनामी मालमत्ता व्यवहार आणि फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.
advertisement
नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक
नव्या व्यवस्थेमुळे मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल. प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल रेकॉर्ड तयार होणार असून भविष्यात वाद उद्भवल्यास पुरावा म्हणून तो उपयोगी ठरणार आहे. तसेच, दलालांमार्फत होणाऱ्या बेकायदेशीर हस्तक्षेपाला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘एक राष्ट्र, एक नोंदणी’ उपक्रमाचा भाग
केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक नोंदणी’ (One Nation, One Registration) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा हा एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत देशभरात मालमत्ता नोंदणीची एकसमान, डिजिटल आणि सुरक्षित प्रणाली विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकनंतर लवकरच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याची योजना आखली जात आहे.
advertisement
नागरिकांसाठी काय बदल होणार?
या निर्णयामुळे मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांना काही अतिरिक्त औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. नोंदणीच्या दिवशी आधार कार्ड सोबत ठेवणे आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक ठरेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
१ फेब्रुवारीपासून आधार कार्ड अन् मालमत्ता खरेदी-विक्री नियमांत मोठे बदल! या गोष्टी असणार अनिवार्य
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement