Success Story: रोजगार गेला, वडापाव सेंटरने पालटलं तरुणाचं नशीब, महिन्याला 2 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
गणेश तागडे हा तरुण 4 वर्षांपासून नाश्ता सेंटर चालवत आहे. यामधून लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
पैठण, चितेगाव यासह विविध भागातून खवय्ये त्यांच्याकडे नाश्त्यासाठी येत असतात. त्यामुळे 1 हजार ते बाराशे वडापाव दररोज विक्री होतात. या नाष्टा सेंटरच्या माध्यमातून तागडे यांची दररोज 30 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होत असते, तसेच महिन्यासाठी खर्च वजा निव्वळ नफा दीड ते 2 लाख रुपयांपर्यंत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
advertisement
advertisement
पैठण रोडवरील गेवराई येथे वडापाव नाश्ता सेंटर सुरू झाले. सध्या वडापाव, ब्रेडवडा, चहा, भजी यासह विविध प्रकारचा नाश्ता उपलब्ध आहे. तसेच हे नाश्ता सेंटर चालवण्यासाठी कुटुंबातील सर्वजण मदत करतात. भाऊ, वडील त्यामुळे सोपे जात असून 2 लाख रुपयांपर्यंत या माध्यमातून कमाई होत असल्याचं देखील तागडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
तागडे यांनी छोट्या पिक अप गाडीत नाश्ता सेंटर सुरू केले आहे. त्यामध्ये पाण्याच्या टाकीसाठी स्वतंत्र जागा, तसेच खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वेगळी जागा, तसेच सर्व पदार्थ बनवण्यासाठी त्यामध्येच जागा केलेली आहे. रात्रीच्या वेळी लाईटची आवश्यकता असते त्यामुळे इन्व्हर्टर बसवण्यात आलेले आहे. साधारणपणे या गाडीला अडीच ते 3 लाख रुपये खर्च आला आहे. तसेच बाकीचे सर्व पदार्थ तुमच्या नियोजनानुसार घेऊ शकता. या गोष्टी नवीन व्यवसायात येण्यासाठी आवश्यक आहेत.