Women Success Story: पारंपरिकतेला आधुनिकतेची दिली जोड, सुरू केला हॅन्डक्राफ्ट व्यवसाय, कमाई लाखात
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत, जुन्या संस्कृतीला नव्या रूपात सादर करणारे उपक्रम सध्या वाढताना दिसत आहेत.
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत, जुन्या संस्कृतीला नव्या रूपात सादर करणारे उपक्रम सध्या वाढताना दिसत आहेत. असाच एक आगळावेगळा व्यवसाय पुण्यातील गौतमी आहेर या तरुणीने सुरू केला आहे. पारंपरिक खण या मराठमोळ्या कापडापासून विविध प्रकारच्या आकर्षक आणि उपयुक्त वस्तू तयार करत, तिने तेशा हॅन्डक्राफ्ट या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
गौतमी आहेर यांचं शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं असून त्यांना होम डेकोरची विशेष आवड आहे. तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी या व्यवसायाची संकल्पना ठरवली. त्या कार्यक्रमात सर्वच गोष्टी आधुनिक होत्या आणि केवळ एकच खणाचं कापड वापरलेलं होतं. ते पाहून त्यांच्या मनात विचार आला की, आपण आपल्या परंपरेपासून दूर जात आहोत. त्यामुळे त्या क्षणीच त्यांनी ठरवलं की पारंपरिक गोष्टींना नव्याने सादर करता येईल का, यावर प्रयोग करायचे.
advertisement
advertisement
या वस्तूंमध्ये कमळ आसन, पान आसन, शुभ चिन्ह असलेली आसनं, तसेच खणाच्या टोप्या, हॅन्डपेन्टेड फ्रेम्स, पर्स, हळदीकुंकवाची करंडं, तोरणं यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, या सर्व वस्तू ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाइज करून दिल्या जातात. हव्या त्या रंगात, साईझमध्ये आणि डिझाइननुसार ग्राहकांना ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतात.
advertisement
advertisement
advertisement