Share Market Crash: SIP बंद करावी की सुरू ठेवावी, तज्ज्ञांनी थेट सांगितलं

Last Updated:
Share Market Crash: म्युच्युअल फंड मार्केटमधील घसरणीनंतर गुंतवणूकदारांची चिंता - काय करावे पुढे?
1/10
गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. यामुळे अनेक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार चिंतेत आहेत. विशेषतः जे गुंतवणूकदार SIP (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत, त्यांची अपेक्षा 25-30% परतावा मिळण्याची होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, बाजाराने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे.

advertisement
2/10
2020 नंतर शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली होती. त्यामुळे अनेक नवख्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, महागाईचा दर आणि व्याजदरवाढ यामुळे बाजारात करेक्शन झाले. ही घसरण अपेक्षित होती, कारण बाजार कधीही सतत वरच जात नाही.

3/10
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार लार्ज कॅप vs स्मॉल कॅप फंड- स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना अधिक नुकसान सहन करावे लागले आहे. कारण स्मॉल कॅप शेअर्समध्ये जोखीम अधिक असते. दुसरीकडे, लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान तुलनेने कमी आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या निर्णयामध्ये डायव्हर्सिफिकेशन फार महत्त्वाचे ठरते.

4/10
SIP बंद करू नका: बाजारात घसरण झाली तरी SIP सुरू ठेवा. कारण SIP च्या माध्यमातून तुम्हाला कमी किमतीत युनिट्स मिळतात, जे भविष्यातील परताव्यासाठी फायदेशीर ठरतात.

5/10
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार फंड रिबॅलन्सिंग: तुमची फंड वाटणी योग्य आहे का याची तपासणी करा. जास्त गुंतवणूक स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंडात असेल तर काही प्रमाणात लार्ज कॅप किंवा हायब्रिड फंडामध्ये गुंतवणूक करा.

6/10
धैर्य ठेवा: बाजारात अस्थिरता ही तात्पुरती असते. लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रोफेशनल सल्ला घ्या, तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून फाइनान्शियल सल्लागाराची मदत घ्या.

7/10
तज्ज्ञांच्या मते, सध्याचा बाजार ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे आणि येत्या काही महिन्यांत रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. भारताची GDP वाढ चांगली असून, जागतिक परिस्थिती सुधारल्यास बाजाराला उभारी मिळेल. मात्र, किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येणार नाही.

8/10
इतिहासावर आधारित आकडेवारीनुसार, SIP गुंतवणूकदारांना सरासरी 10-12% परतावा मिळतो. त्यामुळे 25-30% परताव्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. संयम आणि शिस्तबद्ध गुंतवणूक हेच यशाचे मुख्य गमक आहे.

9/10
शेअर बाजारातील दुसरे दिग्गज गुंतवणूकदार आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सहसंस्थापक रामदेव अग्रवाल यांनीही बाजारातील या घसरणीवर आपले मत व्यक्त केले आहे. रामदेव अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या मते शेअर बाजार आता आपल्या तळाच्या खूप जवळ आहे आणि लवकरच त्यात सुधारणा दिसून येऊ शकते.

10/10
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. इक्विटी म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement