Share Market Knowledge : BSE आणि NSE मध्ये नेमका काय फरक, कुठे लावायचे पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
या दोन्हीमध्ये नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीय का? इतकंच नाही तर बऱ्याचदा या असंही होतं की दोन्हीकडे एकच कंपनी लिस्टेड असेल तर कोणता शेअर घ्यावा, त्याच्या किंमतीत फरक असतो का तो का असतो असे अनेक प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
शेअर मार्केटमध्ये BSE आणि NSE या दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज संस्था आहेत. जिथून संपूर्ण देशभरातील उलाढाल होत असते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं आणि विक्री करणं या दोघांमार्फत होत असतं. या दोन्हीच्या माध्यमातून शेअर्सची सोमवार ते शुक्रवार खरेदी विक्री होत असते. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी असते. रविवारी रिकव्हरीसाठी काहीवेळा पहिले किंवा दोन सत्र शेअर मार्केट सुरू ठेवलं जातं पण ते काहीवेळाच.
advertisement
बीएसईचा प्रमुख सूचकांक सेन्सेक्स आहे. ज्यामध्ये टॉप 30 कंपन्यांचे शेअर्स असतात. NSE चा प्रमुख सूचकांक निफ्टी 50 आहे. ज्यामध्ये टॉप 50 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असतो. NSE च्या तुलनेत BSE वर ट्रेडिंग वॉल्यूम कमी असतो. भारतात सर्वात जास्त ट्रेडिंग वॉल्यूम लिक्विडिटी आणि NSE वर केलं जातं. BSE वर 5000 हून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक BSE आहे.
advertisement
advertisement
जर तुम्ही डे ट्रेडर असाल आणि डेरिव्हेटिव्ह्ज, फ्युचर्स आणि ऑप्शन्ससह स्टॉक ट्रेडमध्ये धोका पत्करत असाल तर NSE हा पसंतीचा पर्याय असेल. शिवाय, उच्च-जोखीम असलेल्या ऑनलाइन व्यवहारांसाठी एनएसईकडे चांगले सॉफ्टवेअर आहे. ज्यांना मागे बसून त्यांची गुंतवणूक वाढत असल्याचे पाहणे आवडते, अशा रूढीवादी गुंतवणूकदारांसाठी बीएसई हा योग्य पर्याय आहे.
advertisement
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)