शेअर मार्केटवर मोठं संकट, गुंतवणूकदारांचं वाढलं टेन्शन 28 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ही घसरण 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण असल्यचं मानलं जात आहे. शेअर बाजारातील हा ट्रेंड शेवटच्या वेळी 1996 मध्ये दिसला होता आणि आता पुन्हा एकदा तो इतिहास घडतोय.
शेअर मार्केटची स्थिती अत्यंत खराब आहे. मागच्या 9 महिन्यात मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळलं आहे. Nifty Index गेल्या पाच महिन्यांपासून सतत घसरत आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. ही घसरण 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण असल्यचं मानलं जात आहे. शेअर बाजारातील हा ट्रेंड शेवटच्या वेळी 1996 मध्ये दिसला होता आणि आता पुन्हा एकदा तो इतिहास घडतोय.
advertisement
advertisement
advertisement
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात थांबवण्याचे संकेत दिले आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारावर होतो आहे. सध्या चीनच्या बाजारात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल चीनकडे वाढला आहे. भारतीय बाजाराचे मार्केट कॅपिटलायझेशन 1 ट्रिलियन डॉलरने घटले आहे, तर चीनच्या बाजाराचे 2 ट्रिलियन डॉलरने वाढले आहे.
advertisement
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार 1996 नंतर पहिल्यांदाच Nifty पाच महिन्यांपासून सतत घसरत आहे. 1994-95 रोजी साधारणपणे 8 महिने मार्केट डाऊन झालं होतं. तेव्हा -31.4 टक्क्यांनी कोसळल्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला होता. 1996 रोजी 5 महिन्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं. एकूण घसरण -26 टक्क्यांपर्यंत झाली होती. 2024-25 रोजी मागच्या 5 महिन्यात एकूण घसरण -11.7 टक्क्यांनी झाली आहे.
advertisement
शेअर बाजारात अशा घसरणीच्या काळात अनेकांना आपले पैसे बुडतील अशी भीती वाटते. पण याच वेळी स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी (Golden Opportunity) निर्माण होते. मात्र अभ्यास न करता तुम्ही गुंतवणूक केली तर मात्र हातात असलेले पैसेही बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिस्क आहे पण योग्य अभ्यास करुन जर पैसे गुंतवले तर मोठा फायदा होऊ शकतो. Geojit Financial Services चे चीफ स्ट्रॅटेजिस्ट वी. के. विजयकुमार म्हणतात, "या घसरणीमुळे चांगले शेअर्स स्वस्तात मिळत आहेत. लांब कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरू नये."
advertisement
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सध्याचा काळ असा आहे की शॉर्ट टर्म गुंतवणूक करणाऱ्यांसाठी जोखीम जास्त आहे. शेअर्स विकण्याचा विचार करत आहेत त्यांना धोका जास्त आहे. थोडक्यात नुकसान सहन करावे लागेल. लाँग टर्मसाठीसाठी ही उत्तम संधी आहे. मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, पुढील काही महिन्यांत बाजार पुन्हा सुधारेल.नेहमीच शेअर बाजाराने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न मिळतील