Datta Jayanti 2024 : महाराष्ट्रात आहेत दत्तांची पुरातन मंदिरे,‘या’ 5 मंदिराबद्दल तुम्हाला माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Datta Jayanti 2024 : दत्त प्रभू यांची आज जयंती आहे. दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील पाच पुरातन दत्त मंदिराविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
दत्त प्रभू यांची आज जयंती आहे. दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला साजरी करण्यात येते. हा दिवस भगवान दत्तात्रेय यांच्या जन्मदिवस आहे. यावर्षी 14 डिसेंबर रोज शनिवारला हा दत्त जयंती आली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागात दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पण, त्या पैकी काही विशेष आणि पुरातन ठिकाणी भक्तांची गर्दी जास्त असते. महाराष्ट्रातील पाच पुरातन दत्त मंदिराविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
मुंबईमधील प्रभादेवी परिसरात असलेले दत्त मंदिर : मुंबईमधील प्रभादेवी परिसरात 84 वर्ष जुने दत्त मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1940 मध्ये झालेली आहे. त्या मंदिरात संगमरवरी मूर्ती असून तिला चांदीचे नक्षी काम केलेले आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे बदलत्या काळातही या मंदिराचे साधेपण अजूनही टिकून आहे. या मंदिरात दत्त मूर्ती सोबतच तुम्हाला लक्ष्मी नारायण, मारोती, गणपती, महादेवाची पिंड या सर्वांचे सुद्धा दर्शन घ्यायला मिळते.
advertisement
माहूर येथील दत्त शिखर : माहूर येथील दत्त शिखर म्हणजे दत्त देवांचे निद्रास्थान असलेलं ठिकाण म्हणून प्रचलित आहे. माहूर गडावर 8 स्थान आहेत. त्यापैकी 6 नंबरचे स्थान म्हणजे दत्त शिखर. येथे दत्त प्रभूंचा वास आहे, असे येथील नागरिक सांगतात. याठिकाणी दत्तांची त्रिमुखी मूर्ती आहे. त्याचबरोबर निसर्गाचा अप्रतिम देखावा सुद्धा येथे तुम्हाला बघायला मिळते.
advertisement
कोल्हापूरमधील श्री क्षेत्र प्रयाग येथील दत्त : श्री क्षेत्र प्रयाग येथे गुप्त सरस्वती या ठिकाणी दत्त प्रभूंचा वास आहे, असे सांगितले जाते. गुप्त सरस्वती म्हणजे ही एक नदीचं आहे. त्या ठिकाणी दत्ताची पूजा केली जाते. या ठिकाणी पाच नद्यांचा संगम आहे. त्यात कासारी, भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी या नद्यांचा समावेश आहे. श्री क्षेत्र प्रयाग येथे 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान मोठी यात्रा असते. येथील नद्यांच्या संगमतील पाण्याने अंघोळ करण्यासाठी तिथे भक्तांची मोठी गर्दी असते.
advertisement
सोलापूर येथील दत्त मंदिर : सोलापूर येथे पेशवेकालीन जुन्या दत्त मंदिराचे शिल्प आहेत. कोरीव काम करून केलेल्या मूर्ती सुद्धा तिथे आहेत. जवळपास 300 ते 400 वर्ष जुने असलेले हे पुरातन मंदिर आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांनी सोलापूर येथे या मंदिरात मुक्काम केला होता, असेही अनेकांकडून सांगण्यात येथे. अक्कलकोट ला जाताना या मंदिराचे दर्शन तुम्ही घेऊ शकता.
advertisement
श्री दत्त मंदिर संस्थान, रावेर, जळगांव : रावेर येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त सुमारे 185 वर्षाची अखंड परंपरा असलेला श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव साजरा करण्यात येते. याठिकाणी स्वामी सच्चिदानंद महाराजांनी वयाच्या 108 व्या वर्षी श्री दत्त मंदिरातच संजीवन समाधी घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक हे मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा अती प्राचीन आहे. इतरही अनेक लोकांची समाधी त्या ठिकाणी आहे.