Mumbai Rain: सावधान! मुंबई, ठाण्यात पावसाचं तुफान, 72 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून हायअलर्ट!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकण किनारपट्टीवर पावसाचं थैमान सुरू असून आज पुन्हा मुंबईसह सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे उशीर, आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून मुसळधार पावसाने अक्षरशः शहरं ठप्प केली. आजही म्हणजे 17 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाच्या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement