Mumbai Weather: मुंबईत दमट हवामान, कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Weather: मुंबई शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी या भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. दुपारनंतर काही भागात मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण विभागात आज म्हणजेच 14 जुलै 2025 रोजी ढगाळ वातावरण असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांप्रमाणे कालही काही भागांत रिमझिम पावसाचे प्रमाण होते, त्यामुळे आजही नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
advertisement
मुंबई शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी या भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. दुपारनंतर काही भागात मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर सौम्य असणार असला तरी, दमट हवामानामुळे नागरिकांना घामाचा त्रास जाणवू शकतो. काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबईत आज संपूर्ण दिवस हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे भागांमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. दुपारनंतर हवामानात बदल होऊन मध्यम स्वरूपाचे मुसळधार पावसाचे सत्र काही वेळ सुरू राहू शकते. हवामान विभागाने या भागासाठी विजांचा इशारा दिला आहे.
advertisement
14 जुलै 2025 रोजी कोकण विभागात ढगाळ वातावरणासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून, दुपारी आणि संध्याकाळी काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. या जिल्ह्यांना हवामान विभागाने 24 यलो अलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्यावर धुके असून, वाहनचालकांना सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी समुद्रात उतरणे टाळावे.
advertisement
14 जुलै 2025 रोजी कोकण विभागात ढगाळ वातावरणासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून, दुपारी व संध्याकाळी काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. घाटमाथ्यावर धुके असून, वाहनचालकांना सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी समुद्रात उतरणे टाळावे.