Mumbai Rain: मुंबईत हवा बदलली, पावसाची उघडीप की पुन्हा धो धो? आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून कोकणात मान्सूचा जोर कायम आहे. आता मात्र हवापालट होणार असून आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
राज्यात मान्सूनने चांगलीच हजेरी लावलेली आहे. 10 जुलै 2025 रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व संपूर्ण कोकण विभागात ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. किनारपट्टीवर दमट हवामान, मध्यम वारं, आणि काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळपासून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागांत सकाळी हलक्या सरींचा अनुभव येईल. पण पावसाचा जोर कमी राहणार असून हवामान विभागाने आज सतर्कतेचा कोणताही अलर्ट दिलेला नाही. तरीही नागरिकांनी छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावे. पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. आजचे तापमान 31°C पर्यंत वाढण्याची शक्यता असून, रात्री 26 °C दरम्यान राहील.तापमान 31°C पर्यंत वाढण्याची शक्यता असून, रात्री 26 °C दरम्यान राहील.
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. किनारी भागात सकाळपासूनच आकाश ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सकाळी आणि संध्याकाळी पडण्याची शक्यता आहे. वसई, डहाणू, तलासरी, बोईसर, विक्रमगड, जव्हार या भागांमध्ये पावसाचा जोर थोडाफार वाढू शकतो. विशेषतः वसई-विरार पट्ट्यात संध्याकाळच्या वेळेस मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.
advertisement
कोकणातील बहुतेक भागात ढगाळ वातावरण असून, सकाळी आणि दुपारी हलक्या सरी तर संध्याकाळी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीला यलो अलर्ट असून सिंधुदुर्गला सतर्कतेचा कोणताही इशारा नाही. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.