कारचे दरवाजे तोडून बाहेर काढले मृतदेह, चार डॉक्टरांवर काळाचा घाला, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रजबपूरमध्ये अपघातात आयुष शर्मा, सप्तऋषि दास, अरनब चक्रवर्ती, श्रेयस पंचोली या चार इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू, कुटुंबीय व युनिव्हर्सिटीवर शोककळा.
एकाच बॅचचे चार डॉक्टर सोबत निघाले, नियतीनं क्रूर खेळ केला आणि अपघातात चौघेही जागीच गेले. अपघात इतका भयंकर होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला. कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. चार होतकरू तरुणांचे आयुष्य आणि त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न हिरावून घेतले. एकाच क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
advertisement
advertisement
advertisement
ही धडक इतकी भयानक होती की, आजूबाजूच्या नागरिकांनी घाबरून धाव घेतली. अपघातस्थळावरील दृश्य अंगावर काटा आणणारे होते. भरधाव वेगामुळे कारचा पुढचा भाग ट्रकमध्ये पूर्णपणे घुसला होता, अक्षरशः तिचा चेंदामेंदा झाला होता. कारचे दरवाजे आतमध्ये दाबले गेले होते आणि चारही तरुण त्याच भयंकर ढिगाऱ्यात अडकले होते. तिथे कसलीही हालचाल नव्हती. ही दृश्ये पाहून मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांचीही हिम्मत झाली नाही.
advertisement
advertisement
advertisement
त्यांना तातडीने आरोग्य केंद्रात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना जागीच मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांचे आणि युनिव्हर्सिटी प्रशासनाचेही मोठे नुकसान झाले आहे. मृत विद्यार्थ्यांची ओळख आयुष शर्मा (दिल्ली), सप्तऋषि दास (त्रिपुरा), अरनब चक्रवर्ती (त्रिपुरा) आणि श्रेयस पंचोली (गुजरात) अशी पटली. युनिव्हर्सिटी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांना ही बातमी दिली, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.


