धडाम धूम आवाज, बिल्डिंग कोसळली, भीषण आगीत 17 होरपळले, मन सुन्न करणारे 7 फोटो

Last Updated:
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात २३ कामगार उपस्थित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
1/7
फटाका कारखान्यात भीषण आग आणि स्फोट झाल्याने १७ जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात २३ कामगार उपस्थित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

advertisement
2/7
स्फोटाच्या तीव्रतेमुळे इमारतीचा संपूर्ण स्लॅब कोसळला आणि २०० मीटरपर्यंत ढिगारा पसरला. घटनास्थळी जिल्हाधिकारी महिर पटेल आणि SDRF पथक पोहोचले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. दीसाचे आमदार प्रवीण माळी आणि अनेक सामाजिक संस्था बचावकार्याला मदत करत आहेत.

3/7
फटाके बनवण्याचा परवाना नसतानाही कारखान्यात स्फोटके साठवली जात होती, असा आरोप करण्यात येत आहे. कंपनीच्या मालकाने केवळ फटाके विक्रीसाठी परवाना घेतला होता, मात्र तो अनधिकृतपणे फटाके उत्पादन करत असल्याचे उघड झाले आहे. कारखान्याचा मालक दीपक खुबचंद सध्या फरार आहे, आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

4/7
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील डीसा जीआयडीसी परिसरात असलेल्या दीपक ट्रेडर्समध्ये ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्फोटाचे आवाज दूरपर्यंत येत होते. डीसाच्या एसडीएम नेहा पांचाळ यांनी सांगितले की, सकाळी ९.४५ वाजता फटाक्यांच्या स्फोटामुळे दोन स्लॅब कोसळले, आणि त्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

5/7
जिल्हाधिकारी महिर पटेल यांनी सांगितले की, स्फोट एवढा प्रचंड होता की संपूर्ण इमारत कोसळली. ढिगाऱ्यात अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. शेजारी राहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "मी घरात असताना अचानक मोठा आवाज झाला.

6/7
बाहेर येऊन पाहिले असता कारखान्यात भीषण आग आणि स्फोट झाल्याचे लक्षात आले. मी त्वरित पोलिस आणि प्रशासनाला कळवले. मात्र, कारखान्याचा मालक घटनास्थळी नव्हता."

7/7
या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने अवैध फटाका उत्पादन करणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी दीपक खुबचंद याच्यावर गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement