दोन्ही डोळ्यांनी अंध, तरी राब राब राबतो शेतात! सोन्या बैलाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
बैल हा शेती कामासाठी महत्त्वाचा घटक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे. हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे.
advertisement
advertisement
सोन्या बैल हा दोन्ही डोळ्यांनी 12 वर्षांपासून अंध आहे. शेतामध्ये काम करताना सोन्या बैलच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी गळत होते. तेव्हा शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी गावातील पशुतज्ज्ञ डॉ. श्रीहरी शिनगारे यांना दाखवले. सोन्याच्या दोन्ही डोळ्यात मांस वाढल्यामुळे डोळे काढून शस्त्रक्रिया करावी लागल असे सांगण्यात आले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण अंध असल्याने तो कितपत आणि कसे शेती काम करणार, पण त्याच्या आरोग्यासाठी ते आवश्यकच होते. त्यामुळे जमेल तसे इंद्रसेन यांनी त्याला उठायला, चालायला शिकवले. दोन डोळे नसतानाही हा बैल बैलगाडीला पेरणीला कोळपणीला चालत आहे, असे प्रत्यक्ष दिसल्यावर शेतकरी येऊन भेट देतात आणि बैलाच्या पाठीवर शबासकीची थाप देतात.