Pune News : पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गालबोट, शॉर्टसर्किटमुळे मंडपाला आग

Last Updated:
Pune News : पुणे शहरात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात शॉर्टसर्किटने मंडपाला आग लागल्याची घटना घडली. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
1/5
पुणे शहरात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. 

advertisement
2/5
कार्यक्रम सुरू असताना आग लागल्यानं कार्यक्रमात श्रोत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आजचा या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.

3/5
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर तार तुटून पडल्याने तेथील कापडाने पेट घेतला. मागे बसलेल्या श्रोत्यांनी मंडपाच्या बाहेर धाव घेतली. यावेळी पं. सुहास व्यास यांचं गायन संपलं होतं.

4/5
त्यानंतर काही वेळ ब्रेक होता. यादरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे. मात्र, फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवलं आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.

5/5
सुरक्षेच्या सर्व उपाययोजना जागीच उपलब्ध असल्याने या छोट्याश्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. अग्नीशमन दलाचा बंब व कर्मचारी जे महोत्सव स्थळी कायम उपस्थित असतात त्यांच्या मदतीने सुरक्षाकर्मी आणि स्वयंसेवक यांनी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement