Weather Alert: पुणे ते कोल्हापूर पुन्हा हवापालट, 15 ऑगस्टला मुसळधार पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 3 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झालाय तर काही भागांत अजूनही उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. 15 ऑगस्ट रोजीही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच तीन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरात सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याठिकाणी कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. आज 22 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
कोल्हापूरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तेथील तापमान 21 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement