खरंच! जेवढे गणपतीचे फोटो किंवा स्टॅचू घरात जास्त, तेवढाच त्रास जास्त, काय सांगतात वास्तूतज्ज्ञ?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय घरांमध्ये गणपती बाप्पाला 'सुखकर्ता' आणि 'दुःखहर्ता' मानले जाते. घराच्या सजावटीसाठी किंवा श्रद्धेपोटी अनेक लोक घराच्या प्रत्येक खोलीत गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीच्या मूर्तींची संख्या मर्यादित असणे आवश्यक आहे.
भारतीय घरांमध्ये गणपती बाप्पाला 'सुखकर्ता' आणि 'दुःखहर्ता' मानले जाते. घराच्या सजावटीसाठी किंवा श्रद्धेपोटी अनेक लोक घराच्या प्रत्येक खोलीत गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये गणपतीच्या मूर्तींची संख्या मर्यादित असणे आवश्यक आहे. जर मूर्तींची संख्या गरजेपेक्षा जास्त झाली किंवा त्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या, तर घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी तणाव आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. गोष्ट फायद्याची या चॅनेलला मुलाखत देताना गणेश कुंभार यांनी एकापेक्षा जास्त मुर्त्या घरात असतील तर काय परिणाम होतो हे स्पष्ट केलं आहे.
advertisement
advertisement
'रिद्धी-सिद्धी' आणि 'शुभ-लाभ' यांचा प्रभाव: असे मानले जाते की, घराच्या मुख्य मंदिरात गणपतीची फक्त एकच मूर्ती असावी. एकापेक्षा जास्त मूर्ती असल्यास 'रिद्धी-सिद्धी' आणि 'शुभ-लाभ' यांचा प्रभाव क्षीण होतो, असे शास्त्र सांगते. यामुळे घरात पैसा न टिकणे किंवा कामात शेवटच्या क्षणी अडथळे येणे असे अनुभव येऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घरामध्ये श्रद्धेपोटी गणपती असणे उत्तम आहे, पण त्यांची संख्या 1 ते 3 पेक्षा जास्त नसावी. जर तुमच्याकडे भेट म्हणून मिळालेल्या अनेक मूर्ती असतील, तर त्यातील एक मुख्य मंदिरात ठेवा आणि इतर मूर्तींची जागा दिशा पाहून निश्चित करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









