कोल्हापूरकरांचा नाद म्हणजे शेवटच! Ind vs Pak सामन्यासाठी 250 किमीचा प्रवास, नादखुळा जल्लोष!

Last Updated:
India vs Pakistan 2025: कोल्हापूरकरांचं क्रिकेटप्रेम हे जगजाहीर आहे. त्यात भारत पाकिस्तान सामना असेल आणि भारताने विजय मिळवला तर नुसता जल्लोष कोल्हापुरात असतो.
1/7
कोल्हापूर आणि खेळ यांचं एक वेगळंच नातं आहे. खेळ कोणताही असो, कबड्डी, फूटबॉल किंवा क्रिकेट, जिंकल्याचा जल्लोष पाहावा तो कोल्हापुरात. नुकतेच चॅम्पीयन ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर कोल्हापुरात मोठा जल्लोष झाला.

advertisement
2/7
टीम इंडियाच्या विजयानंतर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात क्रिकेटप्रेमी जमले होते. हातात तिरंगा आणि भगवा, ‘भारत माता की जय’ची घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करत कोल्हापूरकरांनी जल्लोष केला.

3/7
कोल्हापूरमधील वातावरण नेहमीच उत्साही असतं, पण भारत-पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर तो उत्साह आणि जल्लोष आणखी वाढतो. कोल्हापूरकरांच्या मनात एक वेगळीच ओढ असते त्यांच्या जल्लोष अनुभवण्यासाठी, ज्यात ते आपल्या मित्र-परिवारासोबत एकत्र आल्यानंतर जोरदार जल्लोष करतात.

4/7
“भारताचा विजय निश्चित होता. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी चौकात येऊन जल्लोषाची आधीच तयारी केली होती. आम्ही फक्त वाट पाहात होतो. विजय नेमका कसा होणार? पण विराट कोहली खेळला आणि विषय संपला. भारतानं दणदणीत विजय मिळवला याचा आनंद आहे,” असं एक चाहता म्हणाला. 

5/7
“आम्ही पुण्याहून कोल्हापूरला भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही मूळचे कोल्हापूरचे असल्याने, येथे भारत-पाकिस्तान मॅच पाहण्याचा आणि त्यानंतर होणाऱ्या जल्लोषाचा अनुभव वेगळाच आहे. कोल्हापूरमध्ये क्रिकेटच्या सामन्यांनंतरचा जल्लोष, इथलं उत्साही वातावरण आणि इथले लोक यामुळे मॅच पाहण्याची एक वेगळीच मजा आहे,” असं एक चाहता म्हणाला.

6/7
विराट कोहलीच खरा किंग असून भारताचा छावा आहे. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात त्यानं शतक ठोकलं. याचा खूप आनंद झालाय. त्यामुळं आम्ही मोठा जल्लोष करतोय, असंही चाहत्यांनी सांगितलं.

7/7
दरम्यान, पाकिस्ताविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीने 111 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 100 धावा करत आपले 51 वे वनडे शतक पूर्ण केले. त्यामुळे विराटच्या कोल्हापूरकर चाहत्यांनी मोठा जल्लोष केल्याचं दिसलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement