Bharat Taxi : ओला उबरला टक्कर देणार भारत टॅक्सी, कमी दरात फिरण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन

Last Updated:

Bharat Taxi to Launch Soon : ओला आणि उबरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जी की लवकर सरकारी टॅक्सी रस्त्यावर धावणार असून प्रवाशांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

Bharat Taxi to Launch Soon
Bharat Taxi to Launch Soon
वारंवार ओला किंवा उबरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत असून लवकरच त्यांचे पैसे मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ओला आणि उबर यांना टक्कर देण्यासाठी देशातील पहिली सहकारी अॅप आधारित टॅक्सी सेवा पुढील महिन्यात सुरू होणार आहे. ही सेवा केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली चालवली जाणार असून तिचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सरकार-नियंत्रित पर्याय उपलब्ध करून देणे आहे.
लवकर सुरु होणार 'भारत टॅक्सी' सेवा
'भारत टॅक्सी' ही सेवा केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग यांनी तयार केली आहे. यात सहभागी झालेल्या चालकांना त्यांच्या कमाईचा पूर्ण हिस्सा मिळणार आहे. प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी आणि खासगी अॅपवर चालणाऱ्या कॅब कंपन्यांवर अवलंबित्व कमी व्हावे हे यामागील मुख्य कारण आहे.
पहिल्यांदा कुठे होणार सुरुवात
नोव्हेंबरमध्ये दिल्लीत या सेवेचा चाचणी प्रकल्प सुरू होईल. सुरुवातीला 650 वाहन चालक-मालक या सेवेत सामील होतील. सरकारच्या अंदाजानुसार डिसेंबरपर्यंत देशभरात किमान 5 हजार टॅक्सी चालक 'भारत टॅक्सी' सेवेत सहभागी होतील.
advertisement
गेल्या काही वर्षांत अॅपवर आधारित टॅक्सी सेवा वापरणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक वेळा चालक रागावलेले असतात, गाड्या अस्वच्छ असतात आणि प्रवाशांना मनापासून सेवा मिळत नाही. विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री एकट्या महिलांसाठी प्रवास करताना काही टॅक्सी चालकांकडून वाईट अनुभव आले आहेत. यामुळे केंद्र सरकारने सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय देण्यासाठी 'भारत टॅक्सी' प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे.
advertisement
जून 2025 मध्ये 300 कोटी रुपयांच्या भांडवलासह टॅक्सी सहकारी लिमिटेड स्थापन केले गेले. खासगी कंपन्यांप्रमाणे भारत टॅक्सी चालकांना त्यांच्या ग्राहकांवर कमिशन देण्याची गरज नाही. त्यांना दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक शुल्क आकारण्याची परवानगी आहे, पण तरीही त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असा सरकारचा विश्वास आहे.
सरकारचे उद्दिष्ट आहे की मार्च 2026 पर्यंत मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये ही सेवा सुरू होईल. पुढील काही वर्षांत सन 2030 पर्यंत भारत टॅक्सी ग्रामीण भागात आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये एक लाख चालकांसह धावणार आहे. यामुळे प्रवाशांना देशभरात सुरक्षित आणि विश्वासार्ह टॅक्सी सेवा मिळेल तसेच चालकांना त्यांच्या मेहनतीच्या योग्य मोबदल्याची संधी मिळेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bharat Taxi : ओला उबरला टक्कर देणार भारत टॅक्सी, कमी दरात फिरण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement