IND vs ENG : कॅप्टन्सीच्या शर्यतीत 'वाईल्ड कार्ड एन्ट्री'? अश्विन म्हणतो, CSK च्या 'या' खेळाडूला टीम इंडियाचा कर्णधार करा!

Last Updated:
Ravi Ashwin on Ravindra Jadeja : टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन याने चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडूला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचा दावेदार म्हटलं आहे. अखेरच्या क्षणी अश्विनच्या स्टेटमेंटने खळबळ उडालीये.
1/7
रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या कॅप्टन्सीपदी जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांच्या नावाची चर्चा आहे. अशातच आता नवा कॅप्टन कोण? यावर चर्चा सुरू असताना स्पर्धेत वाईल्ड कार्ड खेळाडूची एन्ट्री झालीये.

advertisement
2/7
टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन याने चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडूला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचा दावेदार म्हटलं आहे. टीम जाहीर होण्याआधी अश्विनच्या स्टेटमेंटने खळबळ उडालीये.

3/7
रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, रविचंद्रन अश्विनने रवींद्र जडेजा हा भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी योग्य दावेदार असल्याचं म्हटलं आहे.

4/7
रवींद्र जडेजा हा त्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन खेळाडूला प्रशिक्षण देण्यास तयार असाल, तर जडेजा त्याच्या नेतृत्वाखाली उपकर्णधारासह दोन वर्षे कर्णधारपद देखील भूषवू शकतो, असा विश्वास देखील अश्विनने व्यक्त केलाय.

5/7
संघासाठी खेळल्यानंतर आपण सर्वजण भारताचे कर्णधारपद भूषवू इच्छितो. जडेजाचेही तेच स्वप्न असले पाहिजे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचेही नेतृत्व केले आहे, पण टी-ट्वेंटीमध्ये त्याला जमलं नाही, असंही अश्विन यावेळी म्हणाला.

6/7
मी असं म्हणत नाही की त्याने कर्णधार व्हावं, परंतु त्याचा नक्कीच विचार केला जाईल. कोणत्याही संघाची निवड केली तरी ती गौतम गंभीरची टीम असेल, असं म्हणत त्याने चेंडू गंभीरच्या पारड्यात टाकलाय.

7/7
दरम्यान, जडेजा आणि जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, गंभीर हा टीम इंडियामधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. कर्णधाराच्या नियुक्तीत त्याची मोठी भूमिका असेल कारण त्याला संघ तयार करायचा आहे, असंही आर अश्विन म्हणाला.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement