HSRP नंबरप्लेट लावणं 'या' गाड्यांना गरजेचं नाही; तुमची गाडी त्यामध्ये येते का? नियम लगेच जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही?मी नाही लावतर काय होईल? किंवा माझ्या गाडीसाठी ते गरजेचं आहे का वैगरे वैगरे.... असे प्रश्न तुम्हाला पण पडले आहेत का?
advertisement
advertisement
advertisement
महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी गाडी मालकांना मुदत देण्यात आली होती. आधी ती मार्च, मग एप्रिल, मग जून अशी करत आता एक शेवटची तारीख 15 ऑक्टोबर असल्याचं विभागानं सांगितलं आहे. त्यानंतर दंड कारला जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
HSRP चा फूल फॉर्म आहे High Security Registration Plate (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट). ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने बंधनकारक केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.
advertisement
सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. बाईक, स्कूटर, कार, एसयूव्ही, जीप, ट्रक, बस, ऑटो रिक्षा या सगळ्या गाड्यांसाठी हा नियम लागू होतो. जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल, तर तुमच्या गाडीत आधीच HSRP असेल, त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement