फक्त एक सफरचंद कापण्याचा VIDEO आणि मिळाले 33000 रुपये, कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Weird Job : सफरचंद कापण्यासाठी हजारो रुपये मिळाले, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. एका महिलेने तिच्या या विचित्र कामाबाबत सांगितलं आहे.
advertisement
27 वर्षांची एक महिला जिला सफरचंद कापण्यासाठी 33 हजार रुपये मिळाले आहेत. सॅफ्रॉन मेरी बॉसवेल असं या महिलेचं नाव आहे. ती इंग्लंडमध्ये राहते. तिने तिच्या कमाईबद्दल असा खुलासा केला की कुणालाच विश्वास बसत नाही आहे. सॅफ्रॉन मेरी बॉसवेल एक कंटेंट क्रिएटर आहे. सॅफ्रॉनकडे येणाऱ्या डिमांड बहुतेकदा साध्या घरगुती कामांसाठी असतात, पण त्याची किंमत असामान्य असते.
advertisement
सॅफ्रॉनने सांगितलं, एका विवाहित पुरुषाने तिला सफरचंद कापतानाचा व्हिडिओ बनवण्यासाठी 33000 रुपये दिले. तिने सांगितलं, तिला एका ग्राहकाकडून एक मेसेज आला. ग्राहकाने तिला बाजारात जाऊन कोणताही पदार्थ खरेदी करण्याची आणि ते खाताना किंवा कापताना स्वतःचे व्हिडिओ बनवण्याची विनंती केली. एकमेव अट अशी होती की सॅफ्रॉनला व्हिडिओमध्ये ग्राहकावर तिचा हक्क सांगायचा होता, तिने त्याला ते खाण्याची परवानगी नाही, असं सांगायचं होतं.
advertisement
advertisement
तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की सफरचंद कापण्यासाठी कोणी इतके पैसे का देईल? पण हा एक विचित्र मानसिक छंद आहे. सॅफ्रॉनला मिळालेली ही सर्वात विचित्र डिमांड नव्हती. आणखी एका व्यक्तीने तिला आपण स्वतःला कपाटात बंद करून कोट हँगर असल्याचं नाटक करणार आणि सॅफ्रॉनने फक्त त्याला मेसेज करायचा की तिला तिचे कपडे काढण्यासाठी तो हँगर बाजूला करायचा आहे. इतकंच नव्हे तर ब्रेडच्या तुकड्यावर पाय ठेवून तो ग्राहकाचा नाश्ता असल्याचं सांगणं अशा कामांसाठीही तिला भरघोस पैसे मिळाल्याचं ती म्हणाली. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)







