अथर्व सुदामेचं काय चुकलं? गणपती Reel च्या वादावर रोहित पवारांकडून पाठराखण, Video पुन्हा शेअर करत म्हणाले...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Pawar On Atharva Sudame Reel : अथर्व सुदामे यानेही ट्रोलरला न घाबरता बेडरपणे पुढं यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Atharva Sudame Reel Controversy : पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेट क्रिएटर अर्थव सुदामे अनेकदा चर्चेत असतो. आपल्या प्रभावी रील्समधून अर्थव प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक संदेशही देताना दिसतो. मात्र, अर्थवच्या एका रीलमुळे सध्या सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. हिंदू मुस्लिम एकतेवर संदेश देणारा रील अर्थव सुदामे याने शेअर केला होता. त्यावरून आता रोहित पवार यांनी अर्थव सुदामेची पाठराखण केलीये.
हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रीलमध्ये काहीएक आक्षेपार्ह नाही, उलट हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म-संस्कृतीला ते साजेसंच आहे. परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली, असं रोहित पवार म्हणाले.
advertisement
रीलमध्ये चुकीचं काय? - रोहित पवार
अथर्व सुदामेच्या या रीलमध्ये चुकीचं काय आहे? हे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात. अथर्व सुदामे यानेही ट्रोलरला न घाबरता बेडरपणे पुढं यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो, असं रोहित पवार म्हणाले आहेत. आपल्या सर्वच संतांनी दिलेली बंधुता आणि सामाजिक एकात्मतेची शिकवण अथर्व सुदामे याच्या या रिलमधून बघायला मिळते. मला अत्यंत आवडलेलं हे रिल मी शेअर करतोय, असं म्हण त्यांनी सोशल मीडियावर रील शेअर केली आहे.
advertisement
आपल्या सर्वच संतांनी दिलेली बंधुता आणि सामाजिक एकात्मतेची शिकवण अथर्व सुदामे याच्या या रिलमधून बघायला मिळते. मला अत्यंत आवडलेलं हे रिल मी शेअर करतोय… pic.twitter.com/4vOJ1Zf8OO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 26, 2025
अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रिलमध्ये काहीएक आक्षेपार्ह नाही, उलट हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या रिलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म-संस्कृतीला ते साजेसंच आहे. परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2025
advertisement
दरम्यान, गणपतीच्या मूर्तीवर त्याने बनवलेल्या एका रील्समुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याला शिव्या आणि धमक्याही मिळत आहेत. या वादामुळे ब्राह्मण महासंघानेही अथर्ववर टीका केली आहे. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्वला थेट सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “अथर्व सुदामे तू फक्त करमणूक कर, लोकांना हसव आणि तुझं पोट भर! यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस.”
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 26, 2025 10:02 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
अथर्व सुदामेचं काय चुकलं? गणपती Reel च्या वादावर रोहित पवारांकडून पाठराखण, Video पुन्हा शेअर करत म्हणाले...


