Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद, काय आहे कारण?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Pune Bhide Bridge Close: दिवाळी संपताच आजपासून पुण्यातील बाबभिडे पूल बंद करण्यात आला होता. दिवाळीनिमित्त भिडे पूल काही प्रमाणात सुरू करण्यात आला होता. दिवाळीनिमित्त तात्पुरता पूल वाहतूकीसाठी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी खुला करण्यात आला होता.
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिवाळी संपताच आजपासून पुण्यातील बाबभिडे पूल बंद करण्यात आला होता. दिवाळीनिमित्त भिडे पूल काही प्रमाणात सुरू करण्यात आला होता. दिवाळीनिमित्त तात्पुरता पूल वाहतूकीसाठी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी खुला करण्यात आला होता. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे. परिणामी आजपासून (शुक्रवार) भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महामेट्रोकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, सप्टेंबरपासून पुण्यातील या पुलाचे काम सुरू होते, आता लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूकीमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांत पुलाचे उरलेले काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील महामेट्रोने केले आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे आणि नागरिकांच्या सोयीसाठी पेठ आणि डेक्कन जिमखाना परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाबा भिडे पूल सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला होता.
advertisement
परंतू तो आता आजपासून बंद करण्यात आला आहे. भिडे पूल बंद असताना नागरिकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल व काकासाहेब गाडगीळ पूल या पुलांचा वापर करून मेट्रो प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा महामेट्रोतर्फे प्रवाशांना या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 24, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद, काय आहे कारण?


