कवी,लेखकांनी खेळला महिला साहित्यिकांसोबत भोंडला, पुण्यातील अनोखा उपक्रम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पुण्यात महिला साहित्यिक यांच्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. दिलासा संस्थेच्या वतीने चिंचवड गाव येथील समरसता गुरुकुलम येथे पुणे,पिंपरी चिंचवड शहरातील पुरुष साहित्यिकांनी महिला साहित्यिकांसोबत भोंडला खेळला.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : महिला लिहायला आणि वाचायला लागल्या त्यानंतर महिला साहित्याकडे वळू लागल्या हळूहळू साहित्यावर चर्चा करायला लागल्या. त्यानंतर आज साहित्य क्षेत्रात महिला नावारूपास आल्या असल्याचं दिसून येतं. याचं पार्श्वभूमीवर पुण्यात महिला साहित्यिक यांच्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.
दिलासा संस्थेच्या वतीने चिंचवड गाव येथील समरसता गुरुकुलम येथे पुणे,पिंपरी चिंचवड शहरातील पुरुष साहित्यिकांनी महिला साहित्यिकांसोबत भोंडला खेळला. विशेष म्हणजे ही भोंडला गीते पारंपारिक चालीत होती पण आजच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारी होती. यामध्ये 40 ते 70 वयोगटातील ज्येष्ठ साहित्यिक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी गुरुकुलम मधील विद्यार्थ्यांनी देखील फेर धरतं यात सहभाग घेतला होता.
advertisement
महाराष्ट्रात जशी वळणावळणावर जशी भाषा बदलते तसे सण साजरा करण्याच्या पद्धतीत थोडा फार फरक जाणवतो. हा भोडल्याचा सण साजरा करताना पूजेसाठी पाच खडे घेतात. त्यांची पान-फुलांनी पूजा करतात. काही ठिकाणी हादग्याची किंवा दुसऱ्या एखाद्या झाडाची फांदी रोवून तिच्याभोवती फेर धरला जातो. यावेळी पुण्यातील पुरुष साहित्यिक तसेच महिला साहित्यिक यांनी फेर धरत अनेक गाणी म्हटली. अनेक सामाजिक प्रश्नांवर गाणी म्हणतं फेर धरत रक्तदान यासारखा संदेश यावेळी देण्यात आला.
advertisement
भोंडल्याची गाणी एका खास चालीने म्हटली जातात. प्रत्येक गाण्यात सासू सून, नणंद-भावजय, सासर-माहेर अशा गोष्टी असतात. परंतु या भोंडला कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान, आरोग्य, भ्रष्टाचार, सध्याची राजकीय परिस्थिती यावर गाणी म्हटली गेली. या अनोख्या भोंडला उत्सवातुन अनेक समाजपयोगी संदेश देण्यात आले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 17, 2024 6:06 PM IST