Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणानंतर बोगस दिव्यांग शिक्षक रडारवर! पुणे झेडपीचं मोठं पाऊल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरी लाटणाऱ्या लोकांविरुद्ध आता मोहीम उघडण्यात आली आहे.
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पुजा खेडकर प्रकरणानंतर दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्याबद्दल सगळ्याच खात्यांकडे वेगवेगळ्या तक्रारी यायला सुरूवात झाल्यात. अशा तक्रारी पुणे जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नियुक्ती घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आयएएस अधिकारी झालेल्या पुजा खेडकरच्या प्रकरणात कारवाई सुरू झाल्यानंतर इतर शासकीय नोकऱ्या मिळवतानाही दिव्यांग आणि क्रीडा कोट्यात मिळवलेले प्रमाणपत्र यावर अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाताहेत. तशा तक्रारी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याने आता दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीत रूजू झालेल्या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने संकलित करण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलेत. तशा तक्रारी व्हॅाटसअपद्वारे प्राप्त झाल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
advertisement
पुणे जिल्हा परिषदेच्या सुमारे 11 हजार शिक्षक सेवेत आहेत. यापैकी अनेक शिक्षक हे रूजू होतांना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करतात. रूजू झाल्यानंतरही त्यांना पदोन्नती, बदली, आयकरात सूट, निवडणुकीच्या कामकाजातून सूट मिळण्यासारखे फायदे ही शिक्षकांकडून मिळवले जातात. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळवण्याची शिक्षकांमध्ये फार ओढ असल्याचंही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नोंदीला आलंय. त्यामुळे ही माहिती संकलित करून जिल्हापरिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेतली जाईल. त्यात काही आढळल्यावर पुढच्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असं शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
advertisement
वाचा - 'म्हणून अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली', बच्चू कडूंनी सांगितलं खरं कारण
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि बोगस क्रीडा प्रकाराचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांचं प्रमाण मोठं असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शिक्षण विभागाने सुरू केलेल्या या कारवाईने बोगस प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांचे धाबे नक्की दणाणले असणार.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 08, 2024 7:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणानंतर बोगस दिव्यांग शिक्षक रडारवर! पुणे झेडपीचं मोठं पाऊल










