E-vehicle : ई-वाहन धारकांसाठी खुशखबर, पिंपरी चिंचवडमध्ये 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार, हे आहे लोकेशन

Last Updated:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील वाढत्या विद्युत् वाहनाच्या वापरला चालना देण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 22 ठिकाणी इ वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत

पिंपरी चिंचवड शहरात नवीन 22 चार्जिंग स्थानके होणार..
पिंपरी चिंचवड शहरात नवीन 22 चार्जिंग स्थानके होणार..
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील वाढत्या विद्युत वाहनाच्या वापराला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 22 ठिकाणी ई-वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. तब्बल 3 वर्षानंतर एका खाजगी कंपनीला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये 23 लाखाहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत. त्यामध्ये जवळपास 50 हजारहून अधिक विद्युत वाहनांचा समावेश आहे. स्वतःच बांधा आणि स्वतःच वापर करा या तत्त्वावर हे एकूण 22 स्थानके उभारण्यात येणार आहेत.
या चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेला कोणताही खर्च लागणार नाही. संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर, त्या जागेवर दहा वर्षांकरिता स्वतःच्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, स्टेशनचे चालन व त्याची देखभाल करणे या बाबी संस्थेने करणे आवश्यक आहे.
advertisement
तसेच प्रति युनिट 17 रुपये अधिक सेवा वस्तू कर म्हणून ग्राहकांकडून चार्जिंग शुल्क म्हणून वसूल करू शकते. एका स्थानकासाठी सुमारे 69 लाख रुपये खर्च येणार असून 22 स्थानकांसाठी वीस कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज बांधण्यात येतोय.
advertisement
या 22 ठिकाणी होणार स्थानके
पालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रांगण, जुना पुणे मुंबई महामार्ग, दुर्गादेवी टेकडी, वाहतूक नगरी निगडी, बर्ड व्हॅली संभाजीनगर, बजाज ऑटो, कुस्ती संकुल भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, मैला निसारण केंद्र चिखली, संत नगर उद्यान कासारवाडी, कोकणे चौक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, लांडेवाडी भोसरी, भक्ती शक्ती पूल निगडी, संत तुकाराम महाराज मेट्रो स्थानक, पी.के. चौक, योगा पार्क पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पिंपळे गुरव, वल्लभनगर, ऑटो क्लस्टर आणि राजर्षी शाहू उद्यान हे 22 ठिकाणी चार्जिंग स्थानकांसाठी निश्चित करण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
E-vehicle : ई-वाहन धारकांसाठी खुशखबर, पिंपरी चिंचवडमध्ये 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार, हे आहे लोकेशन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement