'धूम'मध्येही अशी चोरी झाली नाही! बीड-सोलापूर- धुळे महामार्गावरील धावत्या वाहनांवर 'उडत्या चोरांचा' थरार,पाहून अंगावर शहारे
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
सोलापूर - धुळे महामार्गावर धूम स्टाईल चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ अंगाचा थरकाप उडविणारा आहे.
बीड : मोटारसायकलवर स्टंट करून एखादी चोरी घडवून आणण्याचे प्रकार आपण सिनेमात पाहतो. बॉलीवुडचा धूम चित्रपट तुम्ही बघितला असेल. ज्या चोरांची टोळी शिताफीने मोठ-मोठ्या चोरी करत असतात. यात चोरांची टोळी आपल्या हुशारीने लूटलेले सामान घेऊन हातवर तुरी देऊन पसार होतात. चित्रपटात जगभरातील खतरनाक बाइक स्टंट आहेत. पण खऱ्या जीवनातही अशी एका चोरीची घटना समोर आली आहे. ज्यात चोरांनी आपला जीव धोक्यात टाकून स्टंट करत चोरी केल्याचे दिसत आहे. सोलापूर - धुळे महामार्गावर धूम स्टाईल चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ अंगाचा थरकाप उडविणारा आहे.
सोलापूर ते धुळे महामार्गावर बीड जिल्ह्यात रोड रॉबरी आणि लूटमारीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चालू ट्रॅव्हल्स वर चढून धूम स्टाईल चोरीचे प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे संपूर्ण प्रकार रोखण्यासाठी बीड पोलीस अलर्ट झाले असून याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील गस्त वाढवली असून यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात असून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
advertisement
याबरोबरच प्रवाशांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. बीड पोलीस दलाच्या वतीने प्रवाशांनी ही काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिम सुरु करण्यात आली आहे.
कशी केली जाते चोरी?
- ज्या ठिकाणी जेवणासाठी ट्रॅव्हल्स थांबते ती निघण्यापूर्वी ट्रॅव्हल्स छतावर जाऊन थांबतो त्यानंतर काही अंतरावर ही गाडी जातात प्रवाशांच्या बॅग काढून खाली टाकल्या जातात. खाली असलेले साथीदार या बॅग गोळा करतात आणि त्यातील मौल्यवान वस्तू लंपास करतात. टोलनाक्यावर अथवा चढाच्या ठिकाणी गाडीची गती कमी होतात वरचा चोरटा उतरून पसार होतो.
- तर काही वेळेस चालत्या गाडीच्या पाठीमागे हे चोरटे दुचाकीवरून येऊन शिडीच्या माध्यमातून वरती चढून बॅग लंपास करतात.
- सोलापूर - धुळे महामार्गावर बाहेर राज्यातून येणारे प्रवासी एखाद्या बंद हॉटेल समोर गाडी थांबवून गाडीतच आराम करतात अशा प्रवाशांना चाकूचा अथवा शास्त्राचा भाग दाखवून लुटमार केली जाते.
advertisement
हे इतके भीतीदायक आहे की यात कोणाचाही तोल गेल्यास त्याला जीव गमावावा लागेल.
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'धूम'मध्येही अशी चोरी झाली नाही! बीड-सोलापूर- धुळे महामार्गावरील धावत्या वाहनांवर 'उडत्या चोरांचा' थरार,पाहून अंगावर शहारे


