पुण्यातील हाय-प्रोफाइल दाम्पत्याच्या संसारात नाट्यमय वळण, पती- पत्नीमध्ये थरारक कौटुंबिक ड्रामा; शेवटी घेतला धक्कादायक निर्णय
- Reported by:Niranjan Sherkar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
हुंड्यामुळे होणारा मानसिक छळ आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या अशा घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र पुण्यात मूकबधिर पतीने लग्नाच्या 20 वर्षांनंतर नात्यात वाढणाऱ्या मतभेदांमुळे पत्नीला घटस्फोट देण्याची घटना घडली आहे.
हुंड्यामुळे होणारा मानसिक छळ आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या अशा घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र पुण्यात मूकबधिर पतीने लग्नाच्या 20 वर्षांनंतर नात्यात वाढणाऱ्या मतभेदांमुळे पत्नीला घटस्फोट देण्याची घटना घडली आहे. याबद्दलची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना ॲडव्होकेट इब्राहिम अब्दुल शेख यांनी दिली.
सरकारी नोकरीला असलेल्या मूकबधिर तरुणाने एका गरीब घरातील मुलीशी लग्न केलं, त्यानंतर त्याने पत्नीला उच्च शिक्षण देऊन सरकारी नोकरीलाही लावलं. मात्र सुखी संसाराच्या वीस वर्षानंतर दोघांच्या नात्यांमध्ये संशय वाढू लागला आणि एकमेकांविरोधात वाढलेल्या मतभेदांनी त्यांचं आयुष्य एकदा वेगळ्याच वळणार येऊन थांबले.
पीडित दाम्पत्य हे मूळचे सोलापूरचे मात्र, नोकरी निमित्ताने ते गेल्या 3 वर्षांपासून पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये वास्तव्याला होते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. पीडित दाम्पत्याच्या लग्नाला वीस वर्षे झाले. लग्नाच्या वीस वर्षानंतर देखील दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत आहेत. दाम्पत्यातील वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी एकमेकांविरोधात थेट न्यायालयातच खटले दाखल केले आहेत.
advertisement
गेल्या तीन वर्षांपासून हा खटला पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरू होता, याच दरम्यान उच्च न्यायालय नियुक्त मध्यस्थ वकील इब्राहिम अब्दुल शेख यांनी चार वेळा मध्यस्थी करत या दाम्पत्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीकडून 50 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी होत असताना, पती मात्र दोन लाख रुपये पोटगी देण्यावर ठाम होता. मध्यस्थीनंतर दोघेही बारा लाख रुपये पोटगी आणि मुलांचा ताबा पत्नीकडे इतर अटी शर्ती मान्य करत एकमेकांवरील गुन्हे मागे घेतले. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून दोघांतील दुराव्याला संमती दर्शवली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 7:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील हाय-प्रोफाइल दाम्पत्याच्या संसारात नाट्यमय वळण, पती- पत्नीमध्ये थरारक कौटुंबिक ड्रामा; शेवटी घेतला धक्कादायक निर्णय








