VIDEO : खास थायलंडवरुन गणेशभक्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाने किम यांचे स्वागत केले. किम या गेल्या अनेक वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपतीची आराधना करतात आणि दरवर्षी गणेशोत्सवात त्या सहकुटुंब या ठिकाणी येतात.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा हे लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे दरवर्षी चक्क थायलंड देशातील फुकेत येथून अनेक भाविक पुण्यात श्रींच्या दर्शनाला सातत्याने येतात. त्यातील एक भक्त, थायलंड येथील रहिवासी किम यांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात येऊन दर्शन घेतले आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्या.
advertisement
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाने किम यांचे स्वागत केले. किम या गेल्या अनेक वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपतीची आराधना करतात आणि दरवर्षी गणेशोत्सवात त्या सहकुटुंब या ठिकाणी येतात. यावेळी त्यांनी मंदिरात येऊन बाप्पाची आरतीही केली.
15 महिन्यात एकरी कमावले 11 लाख रुपये, साताऱ्याच्या शेतकऱ्यानं कशाची शेती केली?, VIDEO
यावेळी बोलताना किम म्हणाल्या की, मी दरवर्षी यां ठिकाणी दर्शनासाठी येत असते. दगडूशेठ बाप्पा नेहमी मला व्यवसाय, आरोग्य, परिवार व्यवस्थित ठेवण्यास मदत करत असतो. तुम्ही आयुष्यात एकदा तरी यां ठिकाणी भेट देऊन या उत्सवात सहभागी व्हायला हवे. गणेशोत्सवाचा हा सोहळा तुम्ही पाहायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सहकुटुंब गणपतीची आरती करून खास थायलंड वरून आणलेला गणपती मुकुट बाप्पाला अर्पण केला आहे.
advertisement
आत्तापर्यंत त्यांना मिळालेले यश हे दगडूशेठ गणेशामुळेच मिळाले, असल्याची भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली. थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. एकंदरीतच दगडूशेठ गणपती बाप्पाचे भक्त हे गणेशउत्सवाच्या काळात आवर्जून या ठिकाणी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतात. परदेशातील अनेक भक्तही दररोज बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतात.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 09, 2024 3:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
VIDEO : खास थायलंडवरुन गणेशभक्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली..