advertisement

Gram Panchayat Election : सुप्रियाताईंना आपल्याच मतदारसंघात धक्का, अजितदादांनी उधळला गुलाल

Last Updated:

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघात अजित पवार गटाचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी झालाय.

News18
News18
पुणे, 06 नोव्हेंबर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे.   रविवारी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मतदान झालं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता ग्रामपंचायत निकालांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात पहिला निकाल समोर आला आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघात अजित पवार गटाचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी झालाय. नाटंबी गावचा निकाल लागला असून यात अजित पवार गटाचे समर्थन असलेल्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
भोर तालुक्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे. राष्ट्रवादी पक्षाचा पहिला उमेदवार विजय झालाय अजित पवार गटाचा सरपंच विजय झाला आहे. नाटंबी गावचा हा निकाल आहे. पद्मावती देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. दुसऱ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचाच सरपंच विजयी झालाय. भोर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या गटाला धक्का बसला.
advertisement
ग्रामपंचायत निवडणूक निकाल- अपडेट दुपारी १२.३०
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- २७८
शिवसेना (शिंदे) १३०
राष्ट्रवादी (अजित पवार) २०१
ऊबाठा- ५७
काँग्रेस- ७१
शरद पवार गट- ६६
Gram Panchayat Election : अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा सुपडा साफ, भाजपने सगळ्या जागा जिंकल्या
advertisement
शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण परभव झाला आहे. सर्व आकरा जांगासह सरपंच पदावर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. हा आमदार अशोक पवार यांच्यासाठी जोरदार धक्का मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Gram Panchayat Election : सुप्रियाताईंना आपल्याच मतदारसंघात धक्का, अजितदादांनी उधळला गुलाल
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement